Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM: तिसऱ्या टी20साठी भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल? श्रेयस अय्यरने दिले संकेत

IND vs ZIM 3 rd T 20 Playing 11: झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील तिसरा टी-२० सामना आज खेळला जाणार आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात संघाच बदल होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 01:08 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल?
  • प्रभसिमरन सिंगला मिळू शकते पदार्पणाची संधी
  • प्रिन्स यादव दुखापतग्रस्त
भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० मालिका सलग दुसऱ्या दिवशी खेळवली जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि. २५) झाला, तर तिसरा आणि अंतिम सामना आज, रविवारी होणार आहे. मालिकेत टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली असून, आज क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्नात असेल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४:३० वाजता सुरू होईल आणि हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबवरच खेळला जाईल. या सलग दोन सामन्यांमुळे भारताच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. सलामीवीर अभिषेक शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते आणि हर्ष दुबे पदार्पणही करू शकतो.

Commonwealth Games 2026 मध्ये भारताला धक्का; पदकाची दावेदार तूलिका मानवर NADA ची कारवाई, प्रकरण काय?

संघात होणार बदल?

भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने खुलासा केला आहे की, झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल करावे लागू शकतात. झिम्बाब्वेवर ९० धावांनी विजय मिळवून टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला झालेल्या दुखापतीमुळे रविवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यासाठी संघाला काही बदल करावे लागू शकतात.

आपल्या दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकत असताना स्नायू दुखावल्यामुळे प्रिन्स मैदानाबाहेर गेला. दुखापत होण्यापूर्वी त्याने दोन विकेट्स घेतले होते. सामन्यानंतर अय्यर म्हणाला की, दुर्दैवाने आमचा एक खेळाडू जखमी झाला आहे, त्यामुळे रविवारच्या सामन्यासाठी संघात काही बदल होऊ शकतात. ईशान आणि तिलक यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. मला वाटले होते की या खेळपट्टीवर १८० ते २०० धावा आव्हानात्मक ठरेल परंतु, आम्ही २२० धावा केल्या, जे संघासाठी बोनस ठरले. मैदानावर आपली हीच वृत्ती असायला हवी. वर्तमानात राहणे आणि आपल्या योजना अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.’

प्रभसिमरन सिंगला मिळू शकते पदार्पणाची संधी

आजच्या सामन्यात प्रभसिमरन सिंगला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळू शकते. तो अभिषेक शर्माची जागा घेऊ शकतो. अभिषेक गेल्या काही डावांमध्ये संघर्ष करत आहे. जरी त्याने मागच्या सामन्यात गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, कामाच्या ताणामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. प्रभसिमरन आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने सलग दोन हंगामात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत.

बिश्नोईची जागा घेऊ शकतो हर्ष दुबे

तिसऱ्या टी२० सामन्यात हर्ष दुबे पदार्पण करू शकतो. त्याने यापूर्वीच एकदिवसीय पदार्पण केले असून, दोन सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतले आहेत. दुबे फिरकी गोलंदाजीसह खालच्या फळीत चांगली फलंदाजीही करू शकतो. रवी बिश्नोईने गेल्या काही डावांमध्ये प्रभावी कामगिरी केलेली नाही, त्यामुळे आज हर्ष त्याची जागा घेऊ शकतो.

भारताचा संभाव्य प्लेइंग 11

वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, मयंक यादव, प्रिन्स यादव, यश ठाकूर.

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

Web Title: Ind vs zim 3rd t20 india playing 11 shreyas iyer prince yadav injury prabhsimran singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण
1

Asian Games: ‘जे मिळालंय त्यातचं काम चालवा…’, आशियाई खेळांमध्ये VIP व्यवस्थात नाहीच, काय आहे प्रकरण

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…
2

दुग्धशर्करा योग! टीम India जपानविरुद्ध T20 सामना खेळणार; BCCI ची मोठी घोषणा, वाचा सविस्तर…

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?
3

Ishant Sharma Birthday: ऑस्ट्रेलिया हादरली, पॉंटिंग थरथरला! ‘पेस किंग’ कसा बनला इशांत शर्मा?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.