हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’
नाडाने तुलिका मानवर गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा वेअरअबाउट्स (Whereabout) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यानंतर, एजन्सीने तिला नोटीस बजावत तात्पुरती निलंबनाची कारवाई केली. यामुळे, तिला भारतीय ज्युडो संघातून काढून टाकण्यात आले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना ज्युडो प्रशिक्षकाने सांगितले की, तुलिकाने १२ महिन्यांत तीन वेळा वेअरअबाउट्स नियमांचे उल्लंघन केले होते. नाडाने नोटीस बजावल्यानंतर तिला संघातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाडाच्या (WADA) नियमांनुसार, कोणत्याही १२ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा माहिती दाखल करण्यात अयशस्वी झाल्यास, चाचण्या चुकल्यास किंवा या दोन्ही गोष्टी घडल्यास डोपिंग-विरोधी नियमांचे उल्लंघन होते. नोंदणीकृत चाचणी गटातील खेळाडूंनी त्यांच्या प्रशिक्षणाची आणि निवासाची माहिती नियमितपणे दाखल करणे आणि स्पर्धेबाहेरील चाचणीसाठी उपलब्ध राहण्याकरिता दररोज ६० मिनिटांचा वेळ देणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
तुलिका मान हिने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये महिलांच्या +७८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला. ग्लासगोमध्येही ती चांगली कामगिरी करून पदक जिंकेल अशी अपेक्षा होती. यापूर्वी गुरुवारी, भारतीय ज्युडो संघाला आणखी एक धक्का बसला. पुरुषांच्या -७३ किलो वजनी गटातील खेळाडू अरुण कुमार याला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. स्पर्धेपूर्वी झालेल्या डोपिंग चाचणीत अपयशी ठरल्याने स्पर्धेतून अपात्र ठरणारा तो पहिला भारतीय ज्युडोपटू ठरला आहे.
भारतीय ज्युडो संघ अद्याप ग्लासगोसाठी रवाना झालेला नाही. ज्युडो स्पर्धा ३१ जुलैपासून सुरू होत असून, संघ २७ जुलै रोजी रवाना होणार आहे.






