भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आई सीएनजी पंपावर अपघात झाला (फोटो - सोशल मीडिया)
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांच्या आई सीएनजी पंपावर कारची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका कारने त्यांना जोरात उडवले. यानंतर कारचालक फरार झाला आहे. पुण्यातील एका सीएनजी पंपावर हा सगळा प्रकार रात्री घडला आहे. पोलिसाने या कार चालकाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी शहजाद पूनावाला यांनी केली आहे. या अपघातात शहजाद पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये कार चालकाने जाणूनबुजून शहजाद पूनावाला यांच्या आईला धक्का मारल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
हे देखील वाचा : ‘आपण सर्व जाती-धर्मांना पुढे घेऊन जाऊ’; अजित पवारांचे शेवटचे संभाषण
शहजाद पूनावाला यांनी आईच्या अपघातानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अपघातची माहिती दिली आहे तसेच आरोपींना अटक करण्याची आणि योग्य शिक्षा देण्याची मागणी केली. शहजाद पूनावाला यांनी लिहिले, “एका माणसाने माझ्या आईला जाणूनबुजून धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. आरोपी तिला धडक देऊन पळून गेला. माझ्या आईला लवकरच शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. या वयात तिच्यासोबत असे घडणे खूप त्रासदायक आहे. मला आशा आहे की पुणे पोलिस त्या माणसाला अटक करतील आणि त्याला योग्य शिक्षा मिळेल.” अशी अपेक्षा शहजाद पूनावाला यांनी व्यक्त केली आहे.
यह जानबूझकर कर मारी गयी टक्कर है , कोई गलती से हुआ एक्सीडेंट नही ।
पुलिस से त्वरित कार्यवाही की उम्मीद है।pic.twitter.com/TO0sWkHFmX — PathakSpeaks 🇮🇳 (@rsswale) February 3, 2026
हे देखील वाचा : कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी






