अमनजोत कौर(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs SL W : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकन महिला संघाचा ५९ धावांनी पराभव केला. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाकडून शानदार कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले. तथापि, भारतीय संघाची सुरुवात चांगली नव्हती, सामन्यादरम्यान एकेकाळी भारताची अवस्था बिकट झाली होती, संघाने १२४ धावांत सहा विकेट्स गमावल्या होत्या. आशावेळी अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी डाव सावरला १०३ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढला.
भारताची सहावी विकेट पडल्यानंतर संघ चांगलाच अडचणीत सापडला होता. त्या क्षणी, अमनजोत आणि दीप्ती यांनी संघाला तारले आणि आणि ९९ चेंडूत सातव्या विकेटसाठी १०३ धावा जोडल्या. या भागीदारीने केवळ डावालाच सांभाळले नाही तर भारताला स्पर्धात्मक धावसंख्या देखील गाठून दिली. भारताने ४७ षटकांत २६९ धावा उभ्या केल्या.
हेही वाचा : PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO
महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासामध्ये सातव्या विकेटसाठी किंवा खालच्या फळीतील भागीदारीने शतक गाठण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी, २०२२ मध्ये, भारताच्या पूजा वस्त्राकर आणि स्नेह राणा यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १२२ धावांची भागीदारी रचली होती. यावेळी, भारतीय खेळाडूंनी देखील हाच पराक्रम केला आणि तो इतिहासात नोंदवला गेला.
भारताच्या अमनजोत कौरने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत ५७ धावा फटकावल्या. ती फक्त काही धावांनी जागतिक विक्रम करण्यापासून दूर राहिली. कौर जर ६८ धावा काढल्या असत्या तर आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पूजा वस्त्राकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तीला मोडात आला असता.
भारताचा डाव १२४ धावांवर ६ विकेट्स पडल्या असताना दीप्ती शर्माने ५३ चेंडूत ५३ धावांची जबाबदार खेळी करून भारताचा डाव सावरला तिने भागीदारी मजबूत करत अमनजोतला चांगली साथ दिली. दरम्यान, तसेच भारताच्या स्नेह राणाने खालच्या फळीत आक्रमक फलंदाजी करत भारताला अधिक मजबूत केले. तिने फक्त १५ चेंडूचा सामना करत २८ धावा फटकावल्या. ज्यात तिने २ चौकार आणि २ षटकार लगावले.
हेही वाचा : ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास