अबहीहसक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma’s world record in ICC T20I Rankings : भारतीय संघाने नुकताच आशिया कपचा किताब जिंकला. या स्पर्धेत भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे. अभिषेक शर्माने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळवून इतिहास रचला आहे. या कामगिरीसह त्याने जवळजवळ पाच वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. अभिषेकने आयसीसी रँकिंगमध्ये त्याचा सर्वोच्च रेटिंग पॉइंट 931 वर गेले आहेत.
अभिषेक शर्माने 2020 मध्ये इंग्लंडचा उजव्या हाताचा गोलंदाज डेव्हिड मलानने मिळवलेल्या 919 गुणांच्या सर्वोत्तम रेटिंगला मागे टाकले. असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, आशिया कपमध्ये त्याच्या प्रभावी फॉर्मसाठी आणि 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने काढलेल्या धावायाबाबत प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आलेल्या अभिषेक शर्माने त्याचे सहकारी सूर्यकुमार यादव (912) आणि विराट कोहली (909) यांच्या मागील सर्वोत्तम रेटिंगला देखील मागे टाकले.
हेही वाचा : IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…
अभिषेक शर्माची आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी
अभिषेक शर्मामने मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, खरे तर त्याने आशिया कपच्या सात सामन्यांमध्ये ४४.८५ च्या सरासरीने ३१४ धावा फटकावल्या आहेत. अभिषेक शर्मा इंग्लंडच्या फिल साल्टपेक्षा ८२ रेटिंग गुणांनी पुढे असून त्याचा भारतीय संघातील तिलक वर्मा आशिया कपमध्ये २१३ धावा काढल्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा गोलंदाज पथुम निस्सांका आशिया कपमध्ये २६१ धावा काढल्यानंतर त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग गाठले आहे. तो आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा सहकारी कुसल परेरा दोन स्थानांचा फायदा होऊन नवव्या स्थानावर पोहचला आहे, पाकिस्तानचा साहिबजादा फरहानला ११ स्थानांचा फायदा होऊन तो १३ व्या स्थानावर आणि भारताचा संजू सॅमसनला आठ स्थानांनी वर ३१ व्या स्थानावर पोहचला आहे.
हेही वाचा : PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO
आशिया कप २०२५ मध्ये सात विकेट्स घेतल्यानंतर चक्रवर्ती टी२० क्रिकेटमध्ये नंबर १ गोलंदाज आहे, तर कुलदीप यादव नऊ स्थानांनी वर येऊन १२ व्या स्थानावर पोहचला आहे, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी १२ स्थानांनी वर १३ व्या स्थानावर आणि बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसेन सहा स्थानांनीवर येऊन २० व्या स्थानावर पोहचला आहे.