गूरनूर ब्रारने केली भेदक गोलंदाजी (फोटो- ians)
गूरनूर ब्रारने श्रीलंका अ संघाला आणले अडचणीत
श्रीलंका अ संघाचे 4 फलंदाज केले आउट
कालपासून सुरू झाला आहे दुसरा कसोटी सामना
India A Vs Sri Lanka A Live: सध्या 2 जुलै म्हणजेच कालपासून इंडिया ए विरुद्ध श्रीलंका ए यांच्यातील दूसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पहिला सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताकडून गूरनूर ब्रारने शानदार गोलंदाजी केली आहे. त्याबाबत जाणून घेऊयात. पहिला सामना अनिर्णित झाल्याने दूसरा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
भारत अ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गूरनूर ब्रारने शानदार कामगिरी केली आहे. श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 366 रन्स केल्या. ज्यामध्ये टीम इंडियाने भेदक आणि अचूक गोलंदाजी केली आहे. गूरनूर ब्रारने अफलातून गोलंदाजी केली आहे. याने एकूण 4 विकेट्स घेतल्या.
भारत अ संघाचे नेतृत्व धुरव जुरेल करत आहे. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवहसी श्रीलंका अ संघाने 5 विकेट्समध्ये 288 रन्स केल्या. दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांसामोर श्रीलंका अ ला रोखण्याचे आव्हान होते. यामध्ये गूरनूर ब्रारने शानदार कामगिरी केली आहे. त्याने एकूण 77 रन्स देत महत्वाच्या 4 विकेट्स पटकावल्या.
नुसता राडा! ‘द वॉल’चा मुलगा गाजवतोय मैदान; Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral
गूरनूर ब्रारने शानदार गोलंदाजी केली आहे. त्याने 77 रन्समध्ये 4 विकेट्स पटकावल्या. त्यासोबत सारांश जैनने देखील शानदार गोलंदाजी केली आहे. ऑफ स्पिनरने 4 विकेट्स पटकावल्या. वेगवान गोलंदाज यश ठाकूरने 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी उतरला. भारताने 66 रन्स करत आपली एक विकेट गमावली आहे.
कोण आहे गूरनूर ब्रार?
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाते. मात्र, गुरनूर ब्रारच्या बाबतीत असे नाही. तो २०२३ मध्ये फक्त एकच आयपीएल सामना खेळला. त्याने पंजाब किंग्ससाठी तीन षटकांच्या स्पेलमध्ये ४२ धावा दिल्या. या वेगवान गोलंदाजाची देशांतर्गत कामगिरी प्रभावी असून, त्याने १८ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ५२ बळी मिळवले आहेत. तसेच, लिस्ट ए आणि टी२० सामन्यांमध्ये अनुक्रमे १२ आणि १० बळी त्याच्या नावावर आहेत. आता, आंतरराष्ट्रीय पदार्पणातच आपल्या पहिल्याच षटकात बळी घेतल्यानंतर, तो एका उज्ज्वल कारकिर्दीची अपेक्षा करू शकतो.






