शाहिद आफ्रिदी(फोटो-सोशल मीडिया)
India Pakistan War : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच वाढत गेला असताना युद्धबंदी करारानंतर दोन्ही देशांमधील हल्ले थांबवण्यात आले आहेत. परंतु, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी मात्र थांबण्याची काही एक चिन्हे दिसत नाही आहेत. त्याने पुन्हा एकदा भारताबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आता पूर्वीपेक्षाही जास्त खराब झाले आहेत. या काळात शाहिद आफ्रिदी त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत येत आहे. युद्धबंदीनंतर विजय यात्रा काढून त्याने स्वतःची चेष्टा देखील करून घेतली. पण यावेळी त्याने भारतावर पाकिस्तानची प्रगती रोखण्याचे गंभीर आरोप देखील केले आहेत.
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा भारताविरुद्ध मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे भारत हा पाकिस्तानची प्रगती थांबवत असल्याचा आरोप त्याच्याकडून करण्यात आला आहे. तो म्हणाला की, “भारत पुढे जात आहे, आम्हाला त्यांच्या प्रगतीबद्दल आनंद आहे. त्यांचे क्रिकेटही पुढे जात आहे, जी एक चांगली गोष्ट आहे. आम्ही पुढे जात आहोत, मात्र आम्हाला थांबवले जात आहे, अन्यथा आम्ही वेगाने पुढे गेलो असतो. हे शेजाऱ्यांचे काम आहे का?”
आफ्रिदी हे विसरून गेला की, पाकिस्तान क्रिकेटचे सर्वात मोठे शत्रू त्यांचे स्वतःचेच लोक आहेत, किंवा त्याला ते माहित असेलही पण ते त्याला स्वीकारायचे नाही. गेल्या काही वर्षांत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अनेक अध्यक्षांनी अचानक आपल्या पदांचा राजीनामा दिल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच प्रशिक्षक आणि कर्णधार देखील सतत बदलले आहेत.
एक विशेष की, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे मोठे नुकसान केले आहे, त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भ्याड कृत्य करत भारतातील सामान्य नागरिकांवर ड्रोनने हल्ले केले. परंतु भारतीय सैन्याने ते हल्ले हाणून पाडले आहेत. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली तेव्हा शाहिद आफ्रिदीने तो आपल्या देशाचा विजय असल्याचे मानले आणि त्याने विजय यात्रा देखील काढली होती.
शाहिद आफ्रिदीचा भाऊ २००३ मध्ये अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत मारला गेला होता. तसेच भाऊ शाकिब हा हरकत-उल-अन्सार बटालियन कमांडर असल्याचे बोलेल जात होते. बीएसएफकडून सांगण्यात आले होते की, शाकिबचे शाहिद आफ्रिदीशी संबंध होते, जे त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून सिद्ध झाले आहेत, परंतु आफ्रिदीकडून हे सर्व नाकारण्यात आले होते.