चेतेश्वर पुजारा आणि पूजा पुजारा(फोटो-सोशल मीडिया)
The Diary of a Cricketer’s Wife : भारताचा कसोटीची भिंत म्हणून ओळखला जाणार फलंदाज चेतेश्वर पुजारा बऱ्याच काळापासून भारतीय संघापासून लांब आहे. त्याला अद्यापही संघात पुनरागमनाची संधी देण्यात आलेली नाही. चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून फक्त देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. या काळात पुजाराची पत्नी पूजा पुजाराने एक पुस्तक लिहिले आहे. पूजाने लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ असे आहे. यामध्ये तिने पुजाराच्या कारकिर्दीबद्दल आणि टीम इंडियामधून त्याला वगळण्याबद्दलचा अनुभव सांगितलेला आहे. तसेच त्यात त्यांची पहिली भेट, प्रेमविवाह, चेतेश्वरच्या कारकिर्दीचा वाईट टप्पा आणि भारतीय क्रिकेट संघाच्या आतील कथेबद्दल सविस्तर लिहिले आहे.
चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा पुजारा हिने दैनिक भास्करला तिच्या ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर वाईफ’ या पुस्तकाबाबत मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने एक भावनिक क्षण शेअर केला आहे, जेव्हा चेतेश्वर पुजाराला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियामधून बाहेर ठेवण्यात आले होते.
हेही वाचा : Neeraj Chopra च्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ खास पदवीसह प्रादेशिक सैन्यात मिळाली मोठी जबाबदारी..
पूजा पुढे म्हणाली की, तो क्षण माझ्यासाठी खूप त्रासदायक आणि वेदनादायक होता. चेतेश्वरने भारतासाठी पदार्पण केल्यापासून, संघात अनेक खेळाडू आले आणि गेले, परंतु चेतेश्वरला कधीही वगळण्यात आले नव्हते. पुजाराला त्याच्या संयम आणि तंत्रामुळे भारतीय संघाची “कसोटीची भिंत” म्हटले जाते. पण त्या एका दिवसाने सारच काही बदलून गेलं.
पूजा पुजारा पुढे म्हणाली की, ‘आम्ही तेव्हा सिडनीमध्ये होतो. जेव्हा मला कळले की चेतेश्वर आज प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणार, तेव्हा मी खूप निराश आणि दुखी झाले. मला इतके वाईट वाटले की मला तेव्हा स्टेडियममध्ये जाण्याची अजिबात इच्छा झाली नाही. पूजा म्हणते की सिडनी क्रिकेट स्टेडियम पाहणे हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे एक स्वप्न असते, पण त्या दिवशी तिला काहीच फरक पडला नाही. माझ्या डोळ्यात केवळ अश्रू होते, पण चेतेश्वर खूप सामान्य होता. तो शांत होता, जणू काही घडलेच नाही.
हेही वाचा :IPL 2025 : बीसीसीआयला मोठा झटका! दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची IPL मधून माघार? WTC खेळण्यासाठी मायदेशी परतण्याचे आदेश..
पूजा पुढे म्हणाली की, चेतेश्वर पुजारा हा केवळ एक शिस्तबद्ध खेळाडू नसून तो एक अतिशय खाजगी आणि व्यावसायिक व्यक्तीही आहे. त्याने क्रिकेट ड्रेसिंग रूमच्या बाबी कधीही घरी येऊ दिल्या नाहीत. मी अनेकदा ड्रेसिंग रूममध्ये काय सुरू आहे?कोण काय बोलत आहे? हे विचारायचे, परंतु चेतेश्वरने मला कधी काहीच सांगितले नाही. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, “या गोष्टी घरी नाही तर मैदानावरच राहिल्या पाहिजेत.”