भारत विरुद्ध झिम्बाॅम्बे (फोटो- सोशल मिडिया)
भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या झिम्बाब्वेविरुद्ध तिसरा आणि अंतिम टी 20 सामना खेळणार आहे. हा टी 20 सामना रायपुरच्या रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७:०० वाजता होणार आहे. तीन सामन्यांच्या या सिरीजमध्ये भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND Vs ZIM : भारताचं दमदार कमबॅक, मालिका जिंकण्यासाठी 103 धावांचं आव्हान
भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सिरीजमध्ये एकतर्फी आणि शनदार खेळ केला आहे. सिरीजमध्ये जबरदस्त कामगिरी करून दोन सामन्यांमध्ये आघाडी घेतली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने जिम्बाब्वेवर ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. तर भारताने दुसरा सामना ९ विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकत सिरीज देखील आपल्या नावावर केली आहे. टी-२० सिरीज भारत आणि झिम्बाब्वे महिला संघ तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळणार आहे. ही सर्व सामने गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहेत.
कसे असणार उद्याचे पीच?
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी अत्यंत चांगली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा सामना अत्यानर रोमांचक आणि शानदार होण्याची शक्यता आहे.
भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.
IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका
झिम्बॉब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.






