फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : भारताचा संघ आगामी मालिका इंग्लडविरुद्ध खेळणार आहे. यामध्ये भारताचा संघ पाच सामान्यांची T२० मालिका तर तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताचा संघ युएईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतु अनेक भारत पाकिस्तान वादामुळे भारतीय क्रिकेट संघाचे सामने हायब्रीड पद्धतीने खेळवले जाणार आहेत. भारताचे सर्व सामान्यांचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाचे कर्णधारपदासाठी सज्ज झाला आहे. तर शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. निवडकर्त्यांनी या स्पर्धेसाठी ३ वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळाली आहे. आता, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आलेली नाही.
Neeraj Chopra Marriage: कोण आहे हिमानी मोर, जिच्याशी ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात
चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडिया २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत पहिला सामना खेळणार आहे. आता संजय बांगरने या स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. संजय मांजरेकर म्हणाले, “तीन वेगवान गोलंदाजांपैकी तुम्ही एकाला काढू शकता, तुम्ही बुमराह आणि अर्शदीपसोबत जाऊ शकता. शामीने नुकतीच तंदुरुस्ती परत मिळवली असून इंग्लंडविरुद्ध तो जितके जास्त सामने खेळेल तितके त्याच्यासाठी चांगले होणार आहे, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये तो कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं मनोरंजक ठरेल यावरून देखील त्याचे स्थान निश्चित केले जाऊ शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्याची कामगिरी इंग्लंडच्या मालिकेवरच ठरवली जाईल.
शामी दीर्घ काळानंतर टीम इंडियात परतला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी शमीला तंदुरुस्ती मिळवता आली नाही, त्यामुळे त्याला या महत्त्वाच्या मालिकेपासून दूर राहावे लागले. शामीने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता शामीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. आता शामी २२ जानेवारीपासून इंग्लंडसोबत टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे.
🚨SANJAY BANGAR’S PLAYING X1 FOR CHAMPIONS TROPHY OPENER 💥
ROHIT SHARMA,SHUBMAN GILL,VIRAT KOHLI ,SHREYAS IYER, KL RAHUL, HARDIK PANDYA, RAVINDRA JADEJA, SUNDAR, KULDEEP YADAV, JASPRIT BUMRAH, ARSHDEEP SINGH 🔥#ChampionsTrophy2025 pic.twitter.com/GXHfGrSEXI
— WIN (@WhatsIn_NAME_) January 19, 2025
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.