फोटो सौजन्य- X
भारताची स्टार बॅंडमिटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने सलग दुसरा सामना जिंकत ऑलंम्पिक स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. सात्विक साईराज आणि चिरागने पुरुष दुहेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या मोहम्मद रियान अर्दिआंतो आणि फजर अल्फियान यांचा सरळसेट मध्ये पराभव केला. या विजयासह ऑलम्पिकच्या इतिहासात पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय जोडीने यजमान फ्रांन्सच्या के लुकास कोरवी आणि रोनन लाबर या जोडीचा पराभव केला होता. सलग दुसऱ्या विजयामुळे भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीत सोपा ड्रो मिळणार आहे.
सरळ सेटमध्ये विजय
जागतिक चॅम्पियनशीप विजेती जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्यांवर 21-13, 21-13 असा सरळसेट मध्ये विजय मिळविला. इडोनेशियन जोडी ही वर्ल्ड रॅंकिगनुसार 7 व्या क्रमांकाची जोडी आहे. त्यामुळे हा मुकाबला जबरदस्त होईल असे वाटत होते मात्र भारतीय जोडीने कमालीचा फॉर्म दाखवत सामना एकतर्फी केला. या विजयामुळे भारतीय जोडी गटामध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. या गटातून भारत आणि इंडोनेशियाची जोडी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
Satwik and Chirag will enter the historic Olympic quarterfinal as the winners of ‘Group C’. 😎🇮🇳
📸: @badmintonphoto#Paris2024#IndiaAtParis24#Cheer4Bharat#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/gzOaDaHdg2
— BAI Media (@BAI_Media) July 30, 2024
सात्विक साईराज आणि चिराग शैट्टी हे काल (29 जुलै) आपला दुसरा सामना जर्मनीच्या मार्क लैम्सफस आणि मार्विन सीडेलविरुध्द खेळणार होते मात्र दुखापतीच्या कारणाने लॅम्सफरने माघार घेतली आणि तो सामना रद्द झाला. ज्यामुळे भारतीय जोडीचा उपांत्यपूर्व फेरीचा प्रवेश निश्चित झाला होता. या जबरदस्त फोर्मात असलेल्या भारतीय जोडीकडून भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. भारताने गेल्या तीन ऑलंम्पिकमध्ये बॅंडमिंटनमध्ये पदक जिंकले आहे. त्यापैकी दोन पदके पी व्ही सिंधूने तर एक पदक सायना नेहवालने जिंकले आहे.