फोटो सौजन्य - indiancricketteam
इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका : T२० विश्वचषक (T-20 World Cup 2024) सुरु आहे आणि आज वर्ल्डकप फायनलचा सामना रंगणार आहे. विश्वचषकामध्ये भारताच्या संघाने अंतिम फेरी गाठली आहे तर महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पराक्रम केला आहे. भारताच्या महिला खेळाडूंनी इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चेन्नईत कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात महिलांच्या कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली आहे. शफाली वर्माच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ६०३ धावा केल्या आहेत. यानंतर डाव घोषित करण्यात आला.
या सामन्यामध्ये स्मृती मानधनाने तुफानी कामगिरी करत शतक झळकावले. तिने १४९ धावांची खेळी खेळली. रिचा घोषने ८६ धावा केल्या. या ऐतिहासिक सामन्यामध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विक्रम रचले आहेत. महिलांच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वात महत्वाची आणि ऐतिहासिक भागीदारी शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी केली आहे. या काळात दोघांमध्ये २५० हून अधिक धावांची भागीदारी झाली. स्मृतीने १६१ चेंडूंचा सामना करत १४९ धावा केल्या. त्याच्या खेळीत २७ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता.
भारताच्या महिला सलामीवीर खेळाडूंनी दमदार कामगिरी करून मजबूत स्थितीत उभे केले आहे. भारताच्या दोन्ही सलामीवीर खेळाडूंनी धावांचा पाऊस करून गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शेफाली वर्माने १९७ चेंडूंमध्ये २०५ धावा करत सर्वात जलद गतीने द्विशतक ठोकणारी पहिली महिला ठरली. या खेळीमध्ये २३ चौकार तर ८ षटकार मारले. त्याचबरोबर भारताची महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने शतक ठोकले. तिने पहिल्याच डावात १४९ धावा केल्या आहेत. स्मृती आणि शफाली व्यतिरिक्त रिचा घोष आणि हरमनप्रीत कौर यांनीही चमकदार कामगिरी केली. रिचाने ९० चेंडूंचा सामना करत ८६ धावा केल्या. त्याने १६ चौकार मारले. हरमनप्रीतने ११५ चेंडूंचा सामना करत ६९ धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्जने ९४ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याने ८ चौकार मारले.