Star Pravah:स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रम नुकताच पार पडला, या भव्यदिव्य सोहळ्यासोबतच यंदा रेड कार्पेटवरचा झगमगाटही लक्षवेधी ठरला आहे. या कार्यक्रमाला स्टार प्रवाहचे कलाकार पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या पोशाखात दिसले. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकेतल्या कलाकारांची रेड कार्पेटवरची एण्ट्री हटके ठरली
स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्सेस, लागणार कॉमेडीचा तडका (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५ कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर कलाकारांचा ढिंचॅक अंदाज
धमाकेदार परफॉर्मन्सेस, कॉमेडीचा तडका आणि कलाकारांच्या हटके पोशाखांनी वेधलं लक्ष
या कार्यक्रमात अभिनेत्रींनी पारंपारिक पोशाख परिधान केला होता, त्यांच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधलं. या फोटोत अभिनेत्रींनी मॅचिंग ज्वेलरी देखील घातल्या आहेत.
रेड कार्पेटवर अभिनेत्यांची देखील हजेरी लागली, ते देखील स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळाले. त्यांच्या हॅन्डसम लूकने चाहत्यांचे लक्ष वेधलं.
स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात अभिनेत्रींचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. अभिनेत्रींनी लॉन्ग गाऊन घालून रेड कार्पेटवर हटके एण्ट्री केली
या कार्यक्रमात स्टार प्रवाहातील मालिकेतील खास जोड्या देखील दिसल्या. या जोड्यांनी एकत्र रेडकार्पेटवर पोझ देऊन फोटोदेखील काढले.