काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मागितली बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची माफी मागितली (फोटो - सोशल मीडिया)
Priyanka Gandhi apologizes to Alia Bhatt : केरळ : काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी वाड्रा या संपूर्ण देशामध्ये जोरदार प्रचार करत असतात. पक्षाची विचारधारा पोहचवण्यासाठी प्रियांका गांधी प्रयत्न करत असतात. प्रियांका गांधी मंगळवारी (दि. ७ ऑक्टोबर) रोजी केरळ दौऱ्यावर होत्या. सोशल मीडियावर त्यांनी या दौऱ्याबाबत पोस्ट केली. मात्र या सोशल मीडिया पोस्टमध्ये खासदार प्रियांका गांधी यांनी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिची चक्क माफी मागितली आहे. त्याचबरोबर तिच्या अकाऊंटला टॅग देखील केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हास्यकल्लोळ झाला.
कॉंग्रेस नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांनी केरळमधील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या आपुलकीने चौकशी केली. तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शेतकरी भेटीवेळी प्रियांक गांधी यांना आलिया भट्ट नावाची गाय भेटली. वायनाडच्या लोकसभा सदस्या प्रियांका गांधी यांनी केरळमधील कोडेनचेरी येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांशी अलिकडेच झालेल्या संवादाबद्दल एक्स वरील पोस्टमध्ये या असामान्य भेटीचा उल्लेख केला. त्यांचे हे कारण ऐकून सर्वांनाच हसू आले.
Met a group of dairy farmers at a dairy farm run by the loveliest family (and even encountered a cow named Alia Bhatt!!, due apologies to Ms.Bhatt @aliaa08, but she was really a cutie pie!). Unfortunately dairy farmers are struggling with multiple difficulties and many are… pic.twitter.com/p36oeAZTbF — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 7, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यांना टॅग करत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी खास भेटीबाबत पोस्ट केली. त्या म्हणाल्या की, “एका गोड कुटुंबाने चालवलेल्या डेअरी फार्ममध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या एका गटाला भेटले आणि यावेळी आलिया भट्ट नावाच्या गायीलाही भेटले. आलिया भट्टची मी माफी मागतो, पण ती खरोखरच गोंडस होती.” ते म्हणाले की दुर्दैवाने, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यापैकी बरेच जण उदरनिर्वाह देखील करू शकत नाहीत, अशी खंत देखील खासदार प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पशुवैद्यकीय औषधांच्या वाढत्या किमती ही मोठी समस्या
या दौऱ्यावेळी प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पशू खाद्याची किंमत मोठी वाढली असून शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “मी संबंधित मंत्रालयाला पत्र लिहून त्यांना पशुवैद्यकीय औषधांच्या वाढत्या किमती, पुरेशा विमा संरक्षणाचा अभाव आणि चांगल्या दर्जाच्या पशुखाद्य मिळण्यात येणाऱ्या अडचणींसह अनेक समस्यांबद्दल जाणीव करून देऊ इच्छिते.” काँग्रेस सरचिटणीस पुढे म्हणाले, “या समस्या मला समजावून सांगण्यासाठी वेळ काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा मी आभारी आहे. मी सर्वतोपरी मदत करेन.” असे आश्वासन खासदार प्रियांका गांधी यांनी दिले आहे.