HMD Touch 4G: हा आहे देशातील पहिला 'हाइब्रिड फोन', 3.2-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि किंमत केवळ 3,999 रुपये
HMD Touch 4G भारतात लाँच करण्यात आला आहे. हा देशातील पहिला ‘हायब्रिड फोन’ असल्याचा दावा केला जात आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा नवीन फोन फीचर फोन आणि स्मार्टफोन यांच्यामधील ब्रिजप्रमाणे काम करणार आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन फोन S30+ Touch यूजर इंटरफेसवर चालतो. यामध्ये एक क्विक-कॉल बटन देण्यात आले आहे. या फोनचे काही फीचर्स फीचर फोन सारखे तर काही फीचर्स स्मार्टफोनसारखे आहेत.
आता UPI ट्रान्झॅक्शन करणं झालं आणखी सोपं, पेमेंटसाठी पिनची गरज नाही! NPCI ने लाँच केले नवीन सिस्टम
HMD Touch 4G हा फोन भारतात 64MB + 128MB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. हायब्रिड फोनच्या या व्हेरिअंटची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हा पहिला हायब्रिड फोन सियान आणि डार्क ब्लू कलर ऑप्शनमध्ये HMD India च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनीने प्रेस रिलीजमध्ये पुष्टि केली आहे की, नवीन हँडसेट लवकरच ई-कॉमर्स प्लेटफॉर्म्स आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
HMD Touch 4G मध्ये 3.2-इंचाचा QVGA टच-सपोर्टेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2.5D कवर ग्लाससह येतो. हे डिव्हाईस Unisoc T127 चिपसेटवर आधारित आहे, ज्याला 64MB रॅम आणि 128MB इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हा एक डुअल नॅनो सिम सपोर्टवाला फोन आहे आणि माइक्रो SD कार्डद्वारे 32GB पर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेजला सपोर्ट करतो.
HMD चा हा नवीन Touch 4G हँडसेट S30+ Touch UI वर चालतो. यामध्ये Cloud Apps Suite चा सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामध्ये व्हिडीओ, सोशल आणि यूटिलिटी अॅप्सचा समावेश आहे, जे सरळ डिव्हाईसवर स्ट्रीम होतात. याच्या मदतीने युजर्स क्रिकेट स्कोर, न्यूज, वेदर अपडेट्स आणि HTML5 गेम्स जसे Tetris आणि Sudoku खेळू शकतात. फोटोग्राफीसाठी, HMD Touch 4G मध्ये 2-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, ज्यासोबत LED फ्लॅश यूनिट देखील देण्यात आले आहे. तर फ्रंटला 0.3-मेगापिक्सेलचा VGA सेंसर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे.
HMD Touch 4G मध्ये एक क्विक-कॉल बटन देण्यात आले आहे, ज्याला ICE (In Case of Emergency) असं देखील म्हटलं जात आहे. तीन वेळा कमी वेळा किंवा एकदा लाँग प्रेस केल्यानंतर हे बटण एक्टिव्ह केले जाऊ शकते. यूजर्स Express Chat अॅपद्वारे त्यांच्या कॉन्टॅक्ट्सना टेक्स्ट आणि व्हिडीओ कॉल करू शकतात, जो Android आणि iOS डिवाइसेससाठी फ्री डाउनलोड केले जाऊ शकते.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये HMD Touch 4G मध्ये 4G LTE, VoLTE, Wi-Fi 802.11, Bluetooth 5.0, GPS, Beidou, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक यांचा समावेश आहे. फोन वायर्ड आणि वायरलेस FM Radio दोन्हींना सपोर्ट करते आणि यासोबतच यामध्ये MP3 प्लेयर देखील देण्यात आला आहे. HMD Touch 4G मध्ये 2,000mAh रिमूवेबल बॅटरी देण्यात आली आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर हा फोन ३० तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो. याला IP52 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे. या हायब्रिड फोनचे माप 102.3×61.85×10.85mm आणि वजन 100 ग्रॅम आहे.