ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टी २० मालिका जिंकली(फोटो-सोशल मिडीया)
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा शेवट रोमांचक पद्धतीने झाला. हवामानामुळे मालिकेत वारंवार व्यत्यय देखील आला. या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत मालिका २-१ ने जिंकली. या मालिकेतील दोन सामने पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेले. शनिवारी ब्रिस्बेनच्या गॅबा येथे मालिकेतील शेवटचा आणि पाचवा टी २० सामाना खेळला गेला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला.
गॅबा येथे खेळवण्यात आलेल्या पाचव्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामी जोडी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. ४.५ षटकांत एकही विकेट न गमावता भारताने ५२ धावा केल्या होत्या. शुभमन गिलने उत्कृष्ट फॉर्म दाखवत चौकार मारले, तर अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांचे पुन्हा एकदा चांगले मनोरंजन केले. तथापि, वीज आणि वादळामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पंचांकडून जवळजवळ दोन तास वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : ‘यापुढे शोमध्ये क्रिकेटपटूला आमंत्रण नाही…’, करण जोहरचा विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा, कारण बनले ‘हे’ खेळाडू
अंतिम सामना पूर्ण झाला नसला तरी, या मालिकेत भारताने बाजी मारली. या मालिकेत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची कामगिरी उत्कृष्ट राहिली. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. अभिषेकने पाच सामन्यांमध्ये ४०.७५ च्या सरासरीने १६३ धावा फटकावल्या आणि तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अर्धशतक देखील झकळवले आहे. तसेच त्याने १८ चौकार आणि ६ षटकार देखील ठोकले.
अभिषेक शर्मासोबत, सलामीवीर शुभमन गिलने देखील सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याने पाच सामन्यांमध्ये ४४ च्या सरासरीने १३२ धावा केल्या आहेत. गिल आणि अभिषेक हे मालिकेत १०० पेक्षा जास्त धावा करणारे एकमेव दोन भारतीय फलंदाज ठरले.
गोलंदाजीच्या बाबत बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नाथन एलिसने शानदार कामगिरीचे दर्शन घडवत दबदबा राखला. ५ सामन्यांमध्ये त्याने ९ बळी घेतले. त्याने १४.२ षटकांत फक्त ११५ धावा दिल्या आणि अनेक वेळा भारतीय फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. वरुण चक्रवर्ती हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. टी-२० फॉरमॅटमधील नंबर वन स्पिनर असणाऱ्या वरुणने ५ बळी घेतले आणि १२ षटकांत ८२ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने देखील ४ बळी घेतले आणि पॉवरप्लेमध्ये प्रभावी गोलंदाजीचे दर्शन दिले.
हेही वाचा : IND A vs SA W : दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी, ध्रुव जुरेलने दाखवला दम! झळकवली सलग दोन शतके






