दीप्ती शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
ICC T20 bowling rankings : काल म्हणजेच मंगळवार राजी आयसीसीने महिला टी-२० गोलंदाजांच्या ताज्या क्रमवारी जाहीर केली. या ताज्या क्रमवारीमध्ये भारताची दीप्ती शर्माने दुसरे स्थान पटकावले. तर सलामीवीर स्मृती मानधना फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. दीप्ती ७३२ रेटिंग गुणांसह पाकिस्तानच्या सादिया इक्बालसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत.
सादिया रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरली असून ऑस्ट्रेलियाची अॅनाबेल सदरलँड चार रेटिंग गुणांच्या वाढीसह पहिल्यांदाच अव्वल क्रमांकाची टी-२० गोलंदाज बनण्यात यशस्वी ठरली आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत फक्त तीन बळी घेतल्यानंतर सादियाने रेटिंग गुण गमावले. पाकिस्तान महिला संघाने मालिका १-२ अशी गमावली. मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध चार बळी घेतल्यानंतर सदरलँडने सर्वात लहान आंतरराष्ट्रीय स्वरूपात
एकही सामना खेळलेला नाही. यामुळे तिचे रेटिंग गुण (७३६) बदललेले नाहीत. टी-२० आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत, दीप्ती ३८७ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ती वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज (५०५) आणि न्यूझीलंडची अमेलिया केर (४३४) यांच्या मागे आहे. कलात्मक डावखुरी फलंदाज मानधना (७२८ रेटिंग गुण) इंग्लंडची नॅट सिव्हर-ब्रंट (७३१) यांच्यानंतर एका स्थानाने दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर १० स्थानांनी झेप घेऊन टॉप १० फलंदाजांमध्ये सामील होण्याच्या जवळ आली आहे. ती सध्या ११ व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा : PAK vs WI: कॅरिबियन कर्णधाराने केली पाकिस्तानची धुलाई! शाई होपने एकदिवसीय सामन्यात रचला इतिहास..
आयर्लंडची अष्टपैलू खेळाडू ओर्ला फ्रेंडरगास्टला पाकिस्तानविरुद्धच्या तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. ती तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १९ व्या स्थानावर पोहोचली आहे. आयर्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या अलिकडेच २-१ अशा मालिका विजयात फ्रेंडरगास्ट उत्तम फॉर्ममध्ये होती. २३ वर्षीय खेळाडूने बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये योगदान दिले आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला. उजव्या हाताच्या या फलंदाजाने तीन सामन्यांमध्ये ७२ च्या सरासरीने १४४ धावा केल्या आणि तिच्या उपयुक्त मध्यमगती गोलंदाजीने चार विकेट्सही घेतल्या.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेचा समारोप झाला आहे. या दोन संघात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर एकतर्फी २०२ धावांनी विजय मिळवला आहे. हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा पराभव मनाला जात आहे. दुसरीकडे, हा विजय वेस्ट इंडिज संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. या सामन्यात कॅरेबियन शाई होपने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आहे. शाई होपने तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२० धावांची धमाकेदार खेळी केली. यासह, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची कामगिरी करून दाखवली आहे. शाई होप एकदिवसीय स्वरूपात १८ शतके करणारा वेस्ट इंडिजचा तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत शाई होप तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.