जयडेन सील्स(फोटो-सोशल मीडिया)
West Indies’ Jayden Seals creates history: वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा २०२ धावांनी पराभव केला. या विजयासह वेस्ट इंडिजने २-१ अशी मालिका खिशात टाकली. या सामन्यात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जयडेन सील्सने शानदार गोलंदाजी करत मोठा विक्रम रचला आहे. पाकिस्तान संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात ६ बळी टिपणारा घेणारा सील्स पहिलाच वेस्ट इंडिज गोलंदाज बनला आहे. त्याच्या मर्या पुढे पाकिस्तानची फलदांजी ढेपाळली परिणामी पाकिस्तानी संघ ९२ धावांत ढेपाळला.
तारुबा येथील ब्रायन लारा स्टेडियमवर पाकिस्तानचा वेस्ट इंडिजने धुवावा उडवला. या एकदिवसीय सामन्यात जयडेन सील्सने शानदार गोलंदाजी केली, त्याने ७.२ षटकांत १८ धावा देत ६ बळी टिपले. यासह, तो पाकिस्तानविरुद्ध हा आकडा गाठणारा पहिला वेस्ट इंडिज गोलंदाज ठरला आहे. सील्सपूर्वी, पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या फ्रँकलिन रोजने सर्वोत्तम कामगिरी केली होती. १२ एप्रिल २००० रोजी किंग्सटाऊन येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात रोझने पाकिस्तानविरुद्ध १० षटकांत २३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा : PAK vs WI: कॅरिबियन कर्णधाराने केली पाकिस्तानची धुलाई! शाई होपने एकदिवसीय सामन्यात रचला इतिहास..
एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात, सील्सने सॅम अयुबला बाद करून आपली पहिली विकेट मिळवली. त्यानंतर सील्सने अब्दुल्ला शफीकला बाद करून आपली दुसरी शिकार टिपली. त्यानंतर, त्याने महत्वाची विकेट असणाऱ्या मोहम्मद रिझवानला बाद करून तिसरी विकेट आपल्या नावावर केली. हे तिघे फलंदाज खाते न उघडता माघारी परतले.
सील्सने चौथी विकेट म्हणून बाबर आझमला आऊट केले. ९ धावा काढून बाबर आझम माघारी परतला. सील्सने सामन्याच्या त्याच्या सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नसीम शाहला बाद करत पाचवी विकेट घेतली. सामन्यातील त्याच्या आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर, सील्सने हसन अलीला बॅड करत आपली ६ वी विकेट्स पूर्ण केली.
जेडेन सील्सने ७.२ षटकांत १८ धावा देत ६ बळी टिपले. त्याची ही कामगिरी वेस्ट इंडिजच्या कोणत्याही गोलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेली तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. तो फक्त विन्स्टन डेव्हिसच्या मागे आहे. ज्याने १९८३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०.३ षटकांत ५१ धावा देत ७ बळी घेण्याची किमया केली होती. तसेच ४ फेब्रुवारी १९८१ रोजी किंग्सटाउन येथे इंग्लंडविरुद्ध ९ षटकांत १५ धावा देत ६ बळी टिपले होते. सील्सचा नंबर या दोघांच्या नंतर येतो.
सील्सने आपल्या कामगिरीने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. २७ नोव्हेंबर २०१३ रोजी गकेबेर्हा येथे पाकिस्तानविरुद्ध स्टेनने ९ षटकांत ३९ धावा देत ६ बळी घेण्याची किमया केली होती. आता सील्सने १८ धावांत ६ बळी घेतले आहेत. सील्सच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजने उभ्या केलेल्या २९५ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या पाकिस्तानला फक्त ९२ धावांत गुंडाळले. यासह वेस्ट इंडिजनेतिसरा एकदिवसीय सामना २०२ धावांनी आपल्या खिशात टाकला.