जयपूर : आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल या दोन संघात लढत झाली. या हंगामातीलही २५वी लढत होती, प्रत्येक लढतीत क्रिकेट चाहत्यांना एकापेक्षा एक दमदार मॅच पहायला मिळाल्या आहेत. लीगमध्ये आतापर्यंत अनेक अटीतटीच्या लढती झाल्या आहेत. काल झालेल्या लढतदेखील अशीच चुरशीची झाली.
राजस्थानची सुरुवात चांगली
राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना लखनऊने १५४ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. सलामीच्या जोडीने ८७ धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर राजस्थानने एका पाठोपाठ एक विकेट गमावल्या आणि मॅचदेखील गमावली. अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १९ धावांची गरज होती.
शेवटच्या षटकाने उत्कंठा वाढवली
केएल राहुलने १९ धावांचा बचाव करण्याची जबाबदारी जलद गोलंदाज आवेश खानकडे सोपवली. रियान परागने पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर १ धावा घेतली. पण तिसऱ्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्याच्या जागी ध्रुव जुरेल मैदानात आला. राजस्थानला ३ चेंडूत १४ धावांची गरज होती. ध्रुव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे अशात राजस्थानचे पारडे जड वाटत होते.
दीपक हुडाने अफलातून झेल पकडल्या सामना फिरला
आवेशच्या चौथ्या चेंडूवर जुरेलने मिट विकेट आणि मिड ऑनच्या मधून हवेत चेंडू मारला. हा शॉट म्हणजे षटकार असे सर्वांना वाटले. मात्र तेथे उभा असलेल्या दीपक हुड्डाने अफलातून कॅच घेतला. दीपक सीमा रेषेच्या अगदी जवळ उभा होता. त्याने हवेत उडी उडी घेत अचूकपणे कॅच घेतला. कॅच पकडताना त्याचा पाय सीमा रेषेला लागण्याची शक्यता होती. पण दीपकने अतिशय सावधपणे चेंडू पकडला. दीपकच्या या कॅचने लखनौला १० धावांने विजय मिळून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
लखनऊची प्रथम फलंदाजी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊने २० षटकांत ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. काइल मेयर्सने ५१, कर्णधार राहुलने ३९ तर निकोलस पूरनने २९ धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौने २० षटकात ७ बाद १५४ धावा केल्या होत्या. काइल मेयर्सने ५१, कर्णधार राहुलने ३९ तर निकोलस पूरनने २९ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून यशस्वीने ३५ चेंडूत ४४ तर जोस बटलरने ४१ चेंडूत ४० धावा केल्या. या दोघांशिवाय अन्य फलंदाजांना चमक दाखवता आली नाही.