काव्या मारन(फोटो-सोशल मीडिया)
IPL २०२५ : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणाव वाढत असल्याकारणाने बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे. बीसीसीआयच्या या घोषणेनंतर, आगामी सर्व सामने पुढे ढकलले आहेत. बोर्डाच्या या निर्णयानंतर, सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने तिने चाहत्यांचे मनं जिंकली आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना १० मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळवण्यात येणार होता. पण आता स्पर्धा स्थगित झाल्यामुळे हा सामना देखील होणार नाही. अशा परिस्थितीत, काव्याने या सामन्यासाठी विकल्या गेलेल्या तिकिटांचे संपूर्ण पैसे प्रेक्षकांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियाद्वारे या निर्णयाची माहिती दिली.
८ मे रोजी पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने त्या हल्ल्यांना उधळून लावले. यानंतर, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने तात्काळ आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. या आपत्कालीन बैठकीत सर्व फ्रँचायझी मालकांशी चर्चा केल्यानंतर, ९ मे पासून १ आठवड्यासाठी लीग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एसआरएचने १० मे रोजी होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांचे पैसे परत करण्याचे जाहीर केले.
फ्रँचायझीकडून सांगण्यात आले की, “सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आयपीएल २०२५ तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहे. तिकिटांच्या परतफेडीची माहिती लवकरच दिली जाईल.” एसआरएचच्या या हालचालीनंतर, सोशल मीडियावरील लोक फ्रँचायझी आणि काव्या मारनचे कौतुक करताना दिसत आहे. याशिवाय, एसआरएचने भारतीय सैन्याच्या शौर्य आणि शौर्याला सलाम करणारी एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या वीरांचा सन्मान करतो, अभिमानाने एकजूट होतो आणि भारतीय सशस्त्र दलांच्या अटळ समर्पणाला आम्ही सलाम करतो. जय हिंद.”
हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियात होणार मोठे बदल! कर्णधारपदासाठी ‘या’ दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा..
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील एसआरएच संघासाठी आयपीएल २०२५ खूप वाईट राहिले आहे. या हंगामात त्यांनी ११ सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त ३ सामने जिंकता आले, तर ७ सामान्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला. या खराब कामगिरीमुळे ते ७ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये ८ व्या स्थानावर विराजमान आहेत. एसआरएच आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधून बाहेर पडले आहे.