Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Team India Schedule: IPL 2026 संपलं, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? रोहित-विराट पुन्हा मैदानात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

आता, विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) जे नुकतेच एकमेकांविरुद्ध खेळत होते ते आता 'टीम इंडिया'साठी (Team India) एकत्र खेळताना दिसतील. भारताच्या पुढील सामन्यासाठी चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 01, 2026 | 04:42 PM
IPL 2026 संपलं, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? (Photo Credit- X)

IPL 2026 संपलं, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • IPL 2026 संपलं, आता टीम इंडियाचा पुढचा सामना कधी?
  • रोहित-विराट पुन्हा मैदानात
  • पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule June 2026: इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2026) 19 वी आवृत्ती नुकतीच संपन्न झाली आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपले दुसरे विजेतेपद पटकावले आहे. आता, विराट कोहली (Virat Kohli) आणि शुभमन गिल (Shubman Gill) जे नुकतेच एकमेकांविरुद्ध खेळत होते ते आता ‘टीम इंडिया’साठी (Team India) एकत्र खेळताना दिसतील. भारताच्या पुढील सामन्यासाठी चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. भारताचा पुढील सामना कधी आणि कोणाविरुद्ध होणार आहे हे जाणून घेऊया, तसेच जून महिन्याचे संपूर्ण वेळापत्रकही पाहूया.

टीम इंडियाचा पुढील सामना कधी आहे?

भारत आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. भारताच्या दौऱ्यावर असताना, अफगाणिस्तान संघ एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने होईल; हा सामना 6 ते 10 जून दरम्यान ‘न्यू चंदीगड’ येथे खेळवला जाणार आहे. हा सामना दररोज सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. या मालिकेसाठी शुभमन गिलची कर्णधार म्हणून, तर केएल राहुलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मानव सुथार, गुरकीरत ब्रार आणि हर्ष दुबे यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे.

जून महिन्यातील भारतीय संघाचे वेळापत्रक

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 13 जून रोजी सुरुवात होईल. दुसरा सामना 17 जून रोजी, तर तिसरा एकदिवसीय सामना 20 जून रोजी खेळवला जाईल. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली असून, त्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचाही समावेश आहे. मात्र, हार्दिक पांड्या आणि रोहित यांचा या मालिकेत सहभाग असेल की नाही, हे त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीवर (फिटनेसवर) अवलंबून असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. या मालिकेनंतर, भारत दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करेल. पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी होईल.

नशीब असावे तर असे! Vaibhav Suryavanshi टीम इंडियाकडून खेळणार? BCCI ने दिले ‘हे’ संकेत

6-10 जून – IND विरुद्ध AFG कसोटी (न्यू चंदीगड)
13 जून – IND vs AFG पहिला वनडे सामना (धर्मशाला)
17 जून – IND vs AFG दुसरा एकदिवसीय सामना (लखनौ)
20 जून – IND vs AFG तिसरा एकदिवसीय सामना (चेन्नई)
26 जून – IRE विरुद्ध IND पहिला टी-20 सामना (बेलफास्ट)
28 जून – IRE विरुद्ध IND पहिला टी-20 सामना (बेलफास्ट)

भारताचा कसोटी संघ विरुद्ध अफगाणिस्तान

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

भारताचा एकदिवसीय संघ विरुद्ध अफगाणिस्तान

शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.

Suvendu Adhikari Cabinet: बाऊन्सर टाकणारा गोलंदाज विरोधकांना करणार ‘क्लिन बोल्ड’; बंगाल सरकारमध्ये घेतली मंत्रिपदाची शपथ

Web Title: Ipl 2026 concludes when is team indias next match rohit and virat return to the field check out the full schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs AFG
  • IPL 2026
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
2

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
3

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
4

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.