Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : RCB Vs SRH सामन्यापूर्वी कर्नाटक आमदाराची VIP ट्रीटमेंटची मागणी, म्हणाले, “लाईनमध्ये उभं राहणार नाही…”

IPL फ्रँचायझी RCB आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील ११ जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ११ मृत प्रेक्षकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BCCI ने यावर्षी IPL चा उद्घाटन सोहळाही रद्द केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 28, 2026 | 07:08 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • स्टेडियममधील ११ जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय
  • प्रेक्षकांना श्रद्धांजलीसाठी BCCI ने IPL चा उद्घाटन सोहळाही रद्द
  • आमदारांसाठी VIP आसनांची व्यवस्था
Karnataka MLAs Demand VIP Treatment : IPL 2026 ची सुरुवात होणार आहे. बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर २८ मार्च रोजी, म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी आरसीबीच्या विजय मिरवणुकीदरम्यान 11 प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. IPL फ्रँचायझी RCB आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील ११ जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ११ मृत प्रेक्षकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BCCI ने यावर्षी IPL चा उद्घाटन सोहळाही रद्द केला आहे. मृतांच्या आत्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक मिनिट मौन पाळून स्पर्धेची शांततेत सुरुवात होणार आहे.

IPL 2026 च्या पहिल्या सामन्यात RCB चे प्लेयर्स ‘काळी पट्टी’ बांधून मैदानात? नेमकं कारण काय?

आमदारांसाठी VIP आसनांची व्यवस्था

या सगळ्या भावनिक निर्णयांदरम्यान, कर्नाटकच्या आमदारांनी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये VIP आसनांची व्यवस्था केली आहे. वृत्तानुसार, कर्नाटकच्या आमदारांनी या भावनिक क्षणांमध्येही आपला राजकीय प्रभावाचा वापर केला आहे. राज्यातील आमदारांनी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये व्हीआयपी तिकिटांची मागणी केली, ज्यानंतर त्यांच्यासाठी एक संपूर्ण स्टँड राखीव ठेवण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनवर यांनी तर उघडपणे म्हटलं होतं की, “आम्ही व्हीआयपी आहोत; आम्ही तिकिटांसाठी रांगेत उभे राहू शकत नाही.” प्रत्येक आमदार आणि मंत्र्याला किमान पाच तिकिटे मिळाली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“We are VIPs, We Cannot Stand in Queues: KSCA Should Give 5 Tickets to Each MLA and Minister of Karnataka,” says Congress MLA Vijayananda Kashappanavar Bengaluru Congress MLA Vijayananda Kashappanavar has strongly criticized the Karnataka State Cricket Association (#KSCA) for… pic.twitter.com/hkG3UEhPb0 — Yasir Mushtaq (@path2shah) March 26, 2026

सुविधा आमदारांसाठी की सर्वसामान्य जनतेसाठी?

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनीही सरकारला प्रत्येक आमदाराला किमान चार व्हीआयपी तिकिटे देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, प्रदेश भाजप अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी या वादापासून स्वतःला दूर ठेवत म्हटले की, “आमदार सामान्य नागरिकांपेक्षा वेगळे नाहीत आणि त्यांनी विशेष हक्कांची मागणी करू नये.”
या सगळ्यात याकडेही लक्ष दिले पाहिजे की, न्यायमूर्ती जॉन मायकल डी’कुन्हा आयोगाने हे स्टेडियम असुरक्षित घोषित केले होते, त्यानंतर केएससीएने (KSCA) व्यापक सुरक्षा व्यवस्था लागू केली आणि स्टेडियमच्या पायाभूत सुविधा विकसित केल्या, आणि आता येथे सामने खेळले जात आहेत. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने या सर्व सुविधा आमदारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत की सर्वसामान्य जनतेसाठी?

हा आंधळा कारभार?

स्टेडियमची एकूण आसनक्षमता ४०,००० प्रेक्षकांची आहे. परिणामी, बहुतेक जागा व्हीआयपींसाठी राखीव ठेवल्या जातात, ज्यामुळे तिकिटांच्या दरात लक्षणीय वाढ होते. अहवालानुसार, या मैदानावर काळाबाजार इतका बोकाळला आहे की, ९०० रुपयांचे तिकीट आता १५,००० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे एकीकडे प्रेक्षकांना एवढ्या अवाढव्य किंमतीमध्ये तिकटं विकत घ्यावी लागतात तर दुसरीकडे मात्र आमदार स्पेशल वागणुकीची मागणी करतात. याकडे सरकारने विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

IPL 2026 Live Streaming : RCB विरुद्ध SRH सामन्याने वाजणार IPLचा बिगुल; जाणून घ्या कधी, कुठे पाहाल सामना?

Web Title: Ipl 2026 we are vips we can not stand in line karnataka mlas demand vip treatment ahead of rcb vs srh match marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Congress
  • IPL
  • IPL 2026
  • Ishan Kishan
  • Karnataka
  • RCB vs SRH
  • Sports News
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
1

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
2

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?
3

क्रिकेट विश्वात खळबळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू पोर्तुगालकडून खेळणार; नेमका विषय काय?

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.