हार्दिक पंड्या मुंबईची साथ सोडणार? (फोटो- सोशल मीडिया)
हार्दिक पंड्या स्वतःच दूसरा संघ शोधत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई इंडियन्समध्ये त्याला संधी मळण्याची शक्यता कमी आहे.यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएल 2027 च्या लिलावात मुंबई इंडियन्स मोठे बदल करू शकते. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ट्रेड होऊ शकते.
मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 मध्ये राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालला खरेदी करण्याची चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सच्या ट्रेड लिस्टमध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. रोहित शर्मला पर्याय म्हणून मुंबई इंडियन्स यशस्वीचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई इंडियन्स अनेक मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्याने केले. तो जवळपास तीन वर्षांनी मुंबईच्या संघात कर्णधार म्हणून परतला होता. मात्र आयपीएलच्या यंदाचा हंगामात हार्दिक पंड्याने अक्षरश: निराशा केली. वैयक्तिक खेळी आणि सांघिक खेळीमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे येत्या काळात मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma पुन्हा घेणार जागा?
२०२६ च्या आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि हार्दिक पांड्या फ्रँचायझी सोडणार असल्याच्या वृत्तांमुळे, आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की संघाची सूत्रे कोण हाती घेणार. वृत्तानुसार, तीव्र मानसिक ताण आणि थकव्यामुळे हार्दिक पांड्याने परस्पर संमतीने मुंबई इंडियन्सपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सला अशा नेत्याची गरज आहे जो संघाला पुन्हा मार्गावर आणू शकेल आणि चाहत्यांचा विश्वास जिंकू शकेल. मुंबई इंडियन्सच्या नवीन कर्णधारपदासाठी हे चार खेळाडू प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मुळात रोहित शर्माने या संघाला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याचे नाव हे सर्वात वर असल्याचे सध्या समोर येत आहे.






