Mohammad Shami : 'धर्मांध मूर्खांची पर्वा करू नका..'; शमीचे समर्थन करत जावेद अख्तरांनी मौलाना शहाबुद्दीनला सुनावले खडे बोल(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या सामन्याची उत्सुकता ताणली जात असताना मोहम्मद शमीबाबत एक मुद्दा सध्या जोरात गाजत आहे. क्रिकेटर मोहम्मद शमीच्या एनर्जी ड्रिंकचा विषय चर्चेत आला आहे. या वादात आता लेखक जावेद अख्तर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी शमीचे समर्थन दर्शवत मौलाना शहाबुद्दीनला मूर्ख म्हटले आहे. अख्तर म्हणाले की, ‘तुम्ही या धर्मांध मूर्खांची पर्वा करू नका. ज्यांना दुबईच्या कडक उन्हात पाणी पिल्याने त्रास होतो.’
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी एनर्जी ड्रिंक पितानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचे अनेकांनी कौतुक केले. सर्वांनी सांगितले की शमीने रमजान महिन्यात राष्ट्रीय कर्तव्यापोटी उपवास सोडला. मात्र, ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी गुरुवारी या चित्रासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला. त्यात मौलानाने मोहम्मद शमीला उपोषण मोडल्याबद्दल गुन्हेगार म्हटले होते. त्याच्यावर टीका केली होती.
Shami saheb , don’t give a damn to those reactionary bigoted idiots who have any problem with your drinking water in a burning afternoon at a cricket field in Dubai . It is none of their business. You are one of the great Indian team that is making us all proud My best wishes…
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 7, 2025
या संपूर्ण वादात आता प्रसिद्ध कवी आणि लेखक जावेद अख्तर यांनी शमीचे समर्थन केले आहे. त्यांनी आपल्या एक्स हॅंडलवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे कि,’शमी साहेब, दुबईतील क्रिकेट मैदानावर जळत्या दुपारी तुमच्या पिण्याच्या पाण्याबद्दल ज्यांना काही अडचण आहे, त्या प्रतिगामी धर्मांध मूर्खांची पर्वा करू नका. हा त्यांचा व्यवसाय नाही. तुम्ही त्या महान भारतीय संघांपैकी एक आहात जो आम्हा सर्वांना अभिमानास्पद बनवत आहे. तुम्हाला आणि आमच्या संपूर्ण संघाला माझ्या शुभेच्छा.’ असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : Women’s Day Special : आयपीएल 2025 साठी राजस्थान रॉयल्सकडून ‘पिंक प्रॉमिस’ जर्सी लाँच; ‘या’ संघाविरुद्ध उतरणार मैदनात…
मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले होते की, शरियतचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच इस्लाममध्ये उपवास हे कर्तव्य आहे. जर एखादी व्यक्ती जाणूनबुजून उपवास करत नसेल तर त्याला इस्लामिक कायद्यानुसार पापी मानले जाते. क्रिकेट खेळणे वाईट नाही, पण धार्मिक जबाबदारीही पार पाडायला पाहिजे. मी शमीला शरियतचे नियम पाळण्याची आणि त्याच्या धर्माप्रती जबाबदार राहण्याची सूचना देत आहे.