झारखंडने पटकावले जेतेपद (फोटो-सोशल मीडिया)
Jharkhand wins Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी झारखंड आणि हरियाणा या दोन संघात खेळला गेला. पुण्यात खेळवण्यात आलेल्या जेतेपदाच्या लढतीत झारखंडने हरियाणाचा ६९ धावांनी पराभव केला आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चे पहिले जेतेपद पटकावले. नाणेफेक गमावणाऱ्या झारखंडने प्रथम फलंदाजी करत कर्णधार इशान किशनच्या वादळी शतकाच्या जोरावर ३ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात हरियाणाचा संघ १८.३ षटकात १९३ धावा करून सर्वबाद झाला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात विराट सिंगच्या रूपाने पहिली विकेट् गमावली. त्यानंतर आलेल्या कुमार कुशाग्रसोबत सलामीवीर ईक्षण किशनने १७७ धावांची भागीदारी केली. कर्णधार इशान किशनने जबाबदारीने स्फोटक पारी खेळली. त्याने ४५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने हरियाणाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इशान किशनने ४९ चेंडूत १०१ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार आणि १० षटकार लगावले. त्यानंतर तो बाद झाला. त्याला सुमित कुमारने बाद केले. इशान नंतर कुमार कुशाग्राने देखील अर्धशतक करून बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ८१ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि ५ षटकार लगावले.
कुमार कुशाग्रानंतर आलेल्या अनुकुल रॉयने देखील स्फोटक खेळी करत अवघ्या २० चेंडूत नाबाद ४० धावा करून संघाला चांगल्या स्थितीत पोहचवले. त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. तसेच रॉबिन मिन्झ देखील ३१ धावांवर नाबड राहिला. हरियाणाकडून सुमित कुमार, अंशुल कंबोज आणि सामंत जाखड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
झारखंडने दिलेल्या डोंगरा इतक्या २६३ धावांचा पाठलाग करणाऱ्या हरियाणाची सुरुवात खूपच खराब राहिली. त्यांनी ३६ धावांमध्ये आपले ३ महत्वाचे फलंदाज गमावले. अर्श रंगा १७, कर्णधार अंकित कुमार ०, आशिष सिवाच ० धावा करून बाद झाले. यांच्यानंतर आलेल्या यशवर्धन दलाल आणि निशांत सिंधू यांनी ६७ धावांची भागीदारी केली. यशवर्धन दलाल २२ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला तर सिंधू ३१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सामंत जाखडने ३८ धावा करत थोडा संघर्ष केला पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पार्थ वत्स ४ धावा, सुमित कुमार ५ धावा, अंशुल कंबोज ११ धावा, इशांत भारद्वाज १७ धावा करून बाद झाले तर अमित राणा १३ धावा करून नाबाद राहिला. झारखंडकडून सुशांत मिश्रा आणि बाळ कृष्ण यांनी सर्वाधिक प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर विकास सिंग आणि अनुकुल रॉय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. परिणामी झारखंडने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ चे जेतेपद पटकावले.
That winning feeling! 🥳 Time for celebration in the Jharkhand camp as they win the Syed Mushtaq Ali Trophy for the first time 🙌 Scorecard ▶️ https://t.co/3fGWDCTjoo#SMAT | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/qJB0b2oS0Y — BCCI Domestic (@BCCIdomestic) December 18, 2025
हेही वाचा : IND vs SA 5th t20I : अहमदाबादमधील पाचव्या T20I सामन्यावर ‘रद्द’ चे सावट? जाणून घ्या हवामान अहवाल
हरियाणा संघ : अर्श रंगा, अंकित कुमार (सी), निशांत सिंधू,यशवर्धन दलाल (wk), सामंत जाखड, पार्थ वत्स, आशिष सिवाच, सुमित कुमार, अंशुल कंबोज, अमित राणा, इशांत भारद्वाज
झारखंड : इशान किशन (c) (wk), विराट सिंग, कुमार कुशाग्र, रॉबिन मिन्झ, अनुकुल रॉय, पंकज कुमार,राजनदीप सिंग, बाळ कृष्ण, विकास सिंग, सुशांत मिश्रा, सौरभ शेखर






