Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH vs LSG : ‘या’ दोन खेळाडूंकडून काव्या मारनचा अपेक्षाभंग; सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाला ठरले कारणीभूत…

आयपीएल 2025 च्या 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये एलएसजीने सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत पराभव केला. या पराभवामागील कारणे समोर आली आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 28, 2025 | 07:32 AM
SRH vs LSG: Kavya Maran's expectations were disappointed by 'these' two players; Sunrisers Hyderabad's victory was due to...

SRH vs LSG: Kavya Maran's expectations were disappointed by 'these' two players; Sunrisers Hyderabad's victory was due to...

Follow Us
Close
Follow Us:

SRH vs LSG : आयपीएल 2025  च्या 18 व्या हंगामातील 7 वा सामना 27 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 विकेट्सने दणदणीत पराभव केला.  लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या हैदराबादने लखनौसमोर एकूण 191 धावांचे आव्हान  ठेवले होते. ते लखनौ सुपर जायंट्स संघाने 16.1 षटकांत 5 विकेट्स राखून सहज पूर्ण केले.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 मधील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा मात्र सामना गमावला आहे. गेल्या वर्षभरापासून सनरायझर्स संघाने आयपीएलमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. चाहत्यांना या संघाकडून मोठ्या धावसंख्येची सवय लागली आहे. एलएसजीविरुद्ध  सनरायझर्स हैदराबादने उभारलेली 191 धावसंख्याही कमी नव्हती.  तरी हैदराबादसारख्या खेळपट्टीवर हा संघ 200 हून अधिक धावा करण्यासाठी ओळखला जातो. आजवर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सर्वोच्च धावा उभारण्याचा विक्रम हा हैदराबाद संघाच्या नावे आहे. एलएसजीविरुद्धच्या पराभवाने सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनचा अपेक्षाभंग झाला आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : SRH vs LSG : हैदराबादच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा बोलबाला, पुरन आणि मार्शने चारली धूळ, केलं 5 विकेट्सने पराभूत

अभिषेक शर्मा

सनराईजर्स हैदराबादच्या ताफ्यात अभिषेक शर्मासारखा स्फोटक फलंदाज आहे. गेल्या वर्षी त्याने आपल्या स्फोटक फलंदाजी शैलीने सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले होते.  मात्र, आयपीएल 2025 मधील झालेल्या दोन्ही सामन्यात अभिषेक शर्माची बॅट शांत दिसून आली.   पहिल्या सामन्यात तो  राजस्थानविरुद्ध 24 धावा करून लवकर बाद झाला होता. यानंतर एलएसजीविरुद्ध दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत 6 धावा करून तो शार्दुल ठाकूरचा शिकार ठरला. तर दुसरीकडे त्याचा सहकारी सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने मात्र दोन्ही सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. त्याचवेळी अभिषेक शर्मा मात्र अपयशी ठरल्याचे दिसत आहे. कालच्या(दि. 27 मार्च) सामन्यात हैदराबादच्या पराभवाचे हे देखील एक कारण आहे. कारण अभिषेक 10 षटके जरी थांबला असता तर संघाची धावसंख्या 200 च्या पुढे जण्याची शक्यता होती.

मोहम्मद शमी

सनराईजर्स हैदराबाद संघात स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आहे. अशा वेळी संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि जेव्हा धावसंख्येचा बचाव करावा लागतो तेव्हा ही अपेक्षा अधिकच वाढलेलली दिसते. कालच्या(दि. 27 मार्च) सामन्यात  हैदराबाद संघाने स्कोअर बोर्डवर 190 धावा लावल्या होत्या. यानंतर संघाला त्यांच्या वरिष्ठ गोलंदाजांकडून या धावसंख्येचा बचाव करण्याची मोठी अपेक्षा होती. मात्र मोहम्मद शमीसारखा गोलंदाज असून देखील संघाला धावसंख्येचा बचाव करण्यात अपयश आले. मोहम्मद शमीने एडन मार्करामला बाद केले तरी त्याने 3 षटकांत 37 धावा दिल्या आहेत.

हेही वाचा : SRH vs LSG : लखनौ सुपर जायंट्ससमोर 191 धावांचे लक्ष्य, शार्दूलने ठोकला विकेट्सचा चौकार, हैदराबादी फलंदाजांना रोखलं

दोन्ही संघाची प्लेइंग 11..

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), नितीश रेड्डी,  अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि सिमरजित सिंह

लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग 11 : एडेन मार्कराम,  ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), अब्दुल समद,  डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान

Web Title: Kavya marans expectations were disappointed by two players srh vs lsg ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 07:31 AM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • bcci
  • GT vs RR
  • ICC
  • IPL 2025
  • Mohammad Shami
  • Pat Cummins
  • RCB vs MI
  • Rishabh Pant
  • SRH vs LSG

संबंधित बातम्या

बांगलादेशचा भारतात T20 World Cup खेळण्यास स्पष्ट नकार; ICC ला पत्र लिहून व्यक्त केली मोठी भीती
1

बांगलादेशचा भारतात T20 World Cup खेळण्यास स्पष्ट नकार; ICC ला पत्र लिहून व्यक्त केली मोठी भीती

न्यूझीलंडविरुद्ध Team India चा संघ जाहीर; गिल, अय्यरचे कमबॅक तर ‘या’ खेळाडूंना डच्चू
2

न्यूझीलंडविरुद्ध Team India चा संघ जाहीर; गिल, अय्यरचे कमबॅक तर ‘या’ खेळाडूंना डच्चू

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
3

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर
4

IND vs BAN Series Schedule 2026: भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार! वनडे आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.