फोटो सौजन्य - Lucknow Super Giants सोशल मीडिया
Lucknow Super Giants won by 5 wickets : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना झाला आहे. या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाच्या हाती आयपीएल २०२५ मध्ये पहिला विजय लागला आहे तर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नशिबी पहिला पराभव मिळाला आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबाद 5 विकेट्सने पराभूत केले आहे. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी सनरायझर्स हैदराबाद धुतलं. यापूढे निकोलस पुरनने संघासाठी १८ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श याने ३१ चेंडूमध्ये ५२ धावा केल्या. तर निकोलस पूरन याने संघासाठी २६ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. ऋषभ पंत आणखी एकदा या सामन्यात फेल ठरला १५ चेंडूमध्ये १५ धावा करून बाद झाला. डेव्हिड मिलर नाबाद राहिला तर अब्दुल समदने संघासाठी कमालीची फलंदाजी शेवटच्या षटकांमध्ये कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या तिसऱ्या षटकात शार्दुल ठाकूरने हैदराबादला दोन मोठे धक्के दिले. शार्दुलने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला फक्त ६ धावांवर बाद केले. यानंतर, पुढच्याच चेंडूवर शार्दुलने इशान किशनला खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. शाहबाज अहमदच्या जागी आवेश खानने संघात प्रवेश केला आहे.
Match 7. Lucknow Super Giants Won by 5 Wicket(s) https://t.co/X6vyVEvxwz #SRHvLSG #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
ट्रॅव्हिस हेड क्रीजवर पूर्णपणे स्थिर दिसत होता. अभिषेक शर्मा आणि इशान किशन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, हेड बॅटने खूप आवाज करत होता. लखनौचे गोलंदाज हेडच्या बॅटवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत होते आणि त्यालाही दोन जीवदान देण्यात आले होते. हेडने २७ चेंडूत ४७ धावा केल्या होत्या आणि त्याच्या बॅटमध्ये ५ चौकार आणि ३ षटकार होते. हेडची विकेट घेण्यासाठी कर्णधार पंतने चेंडू नवीन गोलंदाज प्रिन्स यादवकडे सोपवला.
या विजयासह लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने पहिला विजय या १८ व्या सीझनमध्ये मिळवला आहे. या विजयासह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर गेला आहे तर हैदराबादच्या संघाला ६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. हैदराबादचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना पंजाब किंग्स विरुद्ध खेळवला जाणार आहे.