फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
SRH vs LSG 1st innings : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये पहिला डाव संपला आहे. यामध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने बऱ्यापैकी सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरले आहे. लखनौ सुपर जायंट्ससमोर सनरायझर्स हैदराबाद ने १९१ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यामध्ये एकही हैदराबादी फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हल्स ४७ धावांवर रोखले तर अभिषेक शर्माला सहा धावांवर रोखण्यात यशस्वी झाले आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिले फलंदाजीचा आव्हान स्वीकारून संघासमोर १९१ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. यामध्ये ट्रॅव्हिस हेडने संघासाठी २८ चेंडूमध्ये ४७ धावा केल्या तर अभिषेक शर्मा आणखी एकदा फेल ठरला आणि त्याने फक्त सहा चेंडूंमध्ये सहा धावा केला. मागील सामन्यांमध्ये शतक झळकावणारा ईशान किशन एकही धाव न करता शून्य धावा करून आऊट झाला तर नितीश कुमार रेड्डीने ३२ धावांची महत्वाची खेळ खेळली. हेनरिक क्लासेन यांनी १७ चेंडूमध्ये २६ धावा केला. तर अनिकेत वर्माने त्याच्या फलंदाजीने सर्वांना चकित केल्याने त्यांनी १३ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या.
Innings Break!
1⃣9⃣1⃣ is what #LSG need to get their first 𝐖 of #TATAIPL 2025!
Can #SRH defend this total? 🤔
Updates ▶ https://t.co/X6vyVEuZH1#TATAIPL | #SRHvLSG | @SunRisers | @LucknowIPL pic.twitter.com/4gcVjkRgL2
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने संघासाठी १८ धावांची खेळी खेळली, हर्षल पटेल १२ धाव करून नाबाद राहिला. अभिनव मनोहर आणखी एकदा २ धावा करून बाद झाला.
लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर अनसोल्ड शार्दुल ठाकूरने संघासाठी ४ विकेट्स घेतले. आवेश खान, दिग्वेश सिंह, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी १ विकेट संघासाठी घेतला.