फोटो सौजन्य - IndianPremierLeague
Who is Corbin Bosch : आज मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला. आजच्या सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर रिषभ पंतच्या संघाला ५४ धावांनी पराभूत केले. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या संघाने दुसरे स्थान गाठले आहे. या सामन्यात आज मिचेल सॅटनरच्या जागेवर आज कॉर्बिन बॉश याना संघामध्ये स्थान मिळाले होते. आयपीएल तरुणांना एक व्यासपीठ प्रदान करते जिथे जगभरातील प्रतिभावान क्रिकेटपटू त्यांची प्रतिभा दाखवू शकतात. वयाच्या ३० व्या वर्षी, दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशला रविवारी आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने संघासाठी आज कमालीचा खेळ दाखवला.
२०२५ चे वर्ष सुरु झाले तेव्हा पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेअर ड्राफ्टमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्लेयर कॉर्बिन बॉश स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली होती. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पेशावर झल्मी संघासाठी कॉर्बिन बॉशची निवड झाली. पण कॉर्बिन बॉश याला आयपीएलमधून ऑफर मिळाल्यामुळे पाकिस्तान प्रीमियर लीगला लाथ मारली. आयपीएलमध्ये कॉर्बिन बॉशची निवड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी कॉर्बिन बॉश याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक वर्षाची बंदी घातली आहे असे वृत्त समोर आले होते.
🚨 Indian Premier League 2025, LSG vs MI 🚨
Corbin Bosch picked up 1 wicket for 26 runs in 4 overs.#LSGvMI #LSGvsMI #MIvsLSG #MIvLSG #IPL2025 #TATAIPL2025 #TATAIPL #Mumbai #LucknowSuperGiants #OneFamily #MumbaiIndians #CorbinBosch #RaviBishnoi pic.twitter.com/e8jlsu77JN
— Sporcaster (@Sporcaster) April 27, 2025
कॉर्बिन बॉशचा सहकारी जखमी झाल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्समध्ये स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू लिझार्ड विल्यम्स एमआयकडून खेळत होता, परंतु त्याच्या दुखापतीनंतर, कॉर्बिन बॉशने त्याची जागा घेतली आहे. कॉर्बिन बॉशच्या अचानक लीगमधून नाव मागे घेतल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर टीका केली होती. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने याबद्दल माफी मागितली आणि सांगितले की मी पेशावर झल्मीच्या चाहत्यांची माफी मागतो. कॉर्बिन बॉश हा एक प्रतिभावान दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आहे जो त्याच्या अष्टपैलू खेळासाठी ओळखला जातो. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आहे. बॉशने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले आहे.
MI vs LSG : वानखेडेवर मुंबई इंडियन्स बोलबाला! लखनौला मुंबईने 54 धावांनी केलं पराभूत
आजच्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले होते. यावेळी त्याने त्याच्या फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले. आजच्या सामन्यात कॉर्बिन बॉश याने संघासाठी १० चेंडूंमध्ये २० धावा केल्या, यामध्ये त्याने मोठे शॉट देखील मारले. १ षटकार मारला आणि २ चौकार मारून आजच्या सामन्यात फिनिशरची भूमिका साकारली. त्याचबरोबर खेळाडूने आज गोलंदाजी देखील केली आणि यामध्ये त्याने १ विकेट देखील घेतला.