फोटो सौजन्य - IndianPremierLeague
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्याचा अहवाल : मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये वानखेडेवर सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच संघासाठी दमदार फलंदाजी केली आणि सामन्यात दबदबा दाखवला होता. संघाच्या सर्व खेळाडूंनी आज त्यांचा चांगला खेळ दाखवला आहे. फक्त फलंदाजीमध्येच नाही तर मुंबई इंडियन्सने गोलंदाजीमध्ये देखील दमदार खेळ दाखवला. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने हा सामना घरच्या मैदानावर 54 धावांनी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले आहे. आजच्या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यावर एकदा नजर टाका.
लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर मिचेल मार्शने आज २४ चेंडूंमध्ये ३४ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले. एडन मार्करम आजच्या सामन्यात फेल ठरला. त्याने संघासाठी ११ चेंडू खेळले आणि ९ धावा करून बाद झाला. निकोलस पुरन आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याने १५ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या आहेत. रिषभ पंतची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली आहे. आयुष बडोनीने आज चांगली खेळी खेळली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. त्याने आज २२ चेंडूंमध्ये ३५ धावा केल्या. यामध्ये त्याने २ षटकार आणि २ चौकर मारले. डेव्हिड मिलर फलंदाजीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला होता त्याने आज १६ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या. अब्दुल समद फेल ठरला. रवी बिश्नोईने संघासाठी १३ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार मारले.
Just Bumrah things 🤷
A yorker masterclass from Jasprit Bumrah rattled the #LSG batters 👊
Updates ▶ https://t.co/R9Pol9Id6m #TATAIPL | #MIvLSG | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/LKpj6UATZD
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे सांगायचे झाले तर जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यात चमकला. त्याने आज चार विकेट नावावर केले. आजच्या सामन्यात बुमराहने एडन मार्करम, डेव्हिड मिलर, अब्दुल समद आणि आवेश खान यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट याने आज संघासाठी तीन विकेट्स घेतले यामध्ये त्याने दिग्वेश राठी, आयुष बडोनी, आणि मिचेल मार्श यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. विल जॅकस याने संघासाठी दोन विकेट्स घेतले तर बॉश याने संघासाठी १ विकेट घेतला.
पिंक सिटीमध्ये कोणाचा असणार बोलबाला? राजस्थान भिडणार गुजरातशी, जाणून घ्या खेळपट्टीची स्थिती
मुंबईच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर सूर्यकुमार यादवने संघासाठी अर्धशतक झळकवले त्याचबरोबर रायन रीकल्टन याने सुद्धा संघासाठी आज कमालीची फलंदाजी करून अर्धशतक झळकावले. विल जॅक्स याने फलंदाजीमध्येच त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये देखील चांगला खेळ दाखवला.