फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad match report : कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा १५ वा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये पुन्हा एकदा कोलकत्ता नाईट रायडर्सने या स्पर्धेत दुसरा विजय नावावर केला आहे. सनरायझर्स हैदराबादला या स्पर्धेमध्ये शिल्लक तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाने हैदराबादला ८० धावांनी पराभूत केले. या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ईडन गार्डनच्या मैदानावर १२० धावांवर सम्पूर्ण संघाला बाद केले आणि हा हैदराबादचा आयपीएल २०२५ मध्ये सर्वात मोठा पराभव आहे.
कोलकाता नाईट रायडर्स या सामन्या सुरुवात फार काही खास राहिली नाही पण रिंकू सिंग आणि व्यंकटेश संघासाठी कमालीची कामगिरी करून संघाला पुन्हा सामन्यात आणले आणि सनरायझर्स हैदराबादसमोर २०१ भावांचे लक्ष्य उभे केले. या पराभवासह हैदराबादचा संघ आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेमध्ये तळाला म्हणजेच शेवटच्या स्थानावर गेला आहे.
After impressing with the bat and in the field, #KKR 𝙬𝙖𝙡𝙩𝙯𝙚𝙙 their way to a handsome 80-run victory at home 😌💜
Scorecard ▶ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH | @KKRiders pic.twitter.com/Ne4LJhXNP4
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज आणखी एकदा सामन्यात फेल ठरले. संघाचे मुख्य सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही संघासाठी विशेष कामगिरी करू शकले नाही. हेडने संघासाठी दोन चेंडू खेळले आणि चार धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्मा सहा चेंडू खेळून दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचबरोबर ईशान किशन देखील खेळ ठरला आणि नितीश कुमार रेड्डीने देखील आणखी एकदा खराब कामगिरी केली. ईशान किशन आणखी एकदा फेल ठरला त्याने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते त्यानंतर तो संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही. ईशान किशनने संघासाठी ५ चेंडूंमध्ये २ धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीने संघासाठी १५ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या. मेंडिसने संघासाठी २० चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने संघासाठी २१ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या.
कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर वैभव अरोडाने संघासाठी ३ विकेट्स घेतले तर वरून चक्रवर्तीने संघासाठी ३ विकेट्स नावावर केले. आंद्रे रसेलने संघासाठी २ विकेट्स घेतले. हर्षित राणा आणि सुनील नरेनने प्रत्येकी १ विकेट घेतला.
फलंदाजांमध्ये रघुवंशीने संघासाठी अर्धशतक झळकावले, या युवा खेळाडूने संघासाठी ३२ चेंडूंमध्ये ५० धावांची महत्वाची खेळी खेळली. तर कर्णधार अजिंक्य रहाणेने संघासाठी २७ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या. वेंकटेश अय्यरने संघासाठी २९ चेंडूंमध्ये ६० धावांची महत्वाची खेळी खेळली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यात यश मिळाले. १७ चेंडूंमध्ये ३७ धावा रिंकू सिंहने केल्या.