कोलकाता विरुद्ध हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या या सीझनचा आज शेवटचा महामुकाबला रंगणार आहे. आज दोन दिग्गज संघांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे क्रिकेटचे कुशल रणनीती गुरू गौतम गंभीरचे कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि दुसरीकडे आक्रमक फलंदाजीची नवी व्याख्या निर्माण करणाऱ्या पॅट कमिन्सची सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने असणार आहेत. आयपीएल २०२४ च्या सीझनचा मुकुट कोणाच्या हाती लागणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आज क्रिकेट चाहत्यांसाठी अंतिम सामन्यात रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
[read_also content=”हार्दिक आणि नताशाचा घटस्फोटाची चर्चा; नताशाला 70 टक्के संपत्ती द्यावी लागण्याच्या चर्चांणा उधाण; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/sports/hardik-pandya-divorce-will-natasha-take-70-percent-of-pandyas-property-how-did-the-divorce-happen-nryb-538275.html”]
कोलकाता नाईट राइडर्सचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आजचा सामना खेळेल. यंदाच्या सिझनला कोलकाताचा संघ गुणतालिकेमध्ये पहिल्यांदाच अव्वल स्थानावर कायम राहिला. त्याचबरोबर यंदाच्या सिझनला त्यांची कामगिरीसुद्दा सर्वात्तम होती. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या सिझनला त्यांच्या संघातील फलंदाजांनी दमदार कामगिरी आहे. त्याचबरोबर ते क्वालिफायर १ मध्ये कोलकाता नाईट राइडर्सच्या संघाविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये ते विजयाच्या हेतूनेच मैदानात उतरतील. आजच्या सामन्याचे मोफत ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे आणि कधी पाहायचा या बाबतीत आज यासंदर्भात जाणून घेऊया.
घ्या मोफत स्ट्रीमिंगचा आनंद
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी २६ मे रोजी खेळवला जाणार आहे. आजचा हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2024 चा अंतिम सामना IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता होईल. त्याचबरोबर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता आणि जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही या सामन्यातील IPL 2024 च्या अंतिम सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.