लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या(फोटो-सोशल मीडिया)
Kabaddi player Gurvinder Singh shot dead: पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या राज्यातील क्रीडा जगतावर पुन्हा एकदा गुन्हेगारीचे वादळ घोंघावू लागले आहेत. लुधियाना जिल्ह्यातील समराला ब्लॉकमध्ये एका कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची बातमी पुढे आली आहे. हत्या झालेल्या खेळाडूचे नाव गुरविंदर सिंग असे असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून तापसाला सुरुवात झाली आहे.
एका वृत्तानुसार, कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. टोळीशी संबंधित असलेल्या अनमोल बिश्नोईने सोशल मीडिया पोस्टमध्ये या गुन्ह्याची कबुली दिली असून पोस्टमध्ये हरी बॉक्सर आणि आरजू बिश्नोई या दोघांची नावे आहेत. अनमोलने पोस्टमध्ये लिहिले आहे की “ही हत्या त्याचे सहकारी करण माडपूर आणि तेज चक यांनी केली आहे.” या पोस्टसह, पंजाब पोलिस पुन्हा एकदा सतर्क झाले आहेत. या हत्येने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर दिली उघड धमकी
अनमोल बिश्नोईच्या पोस्टने केवळ हत्येची जबाबदारीच स्वीकारली नसून तर स्पष्ट इशारा देखील दिला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते, “हरी बॉक्सर आणि आरजू बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) आज एका कबड्डी खेळाडूच्या हत्येची जबाबदारी घेतात. जो कोणी आपल्या शत्रूंना पाठिंबा देईल त्याला देखीलअसेच नशिब येईल.” या धमकीवरून हे आता स्पष्ट होते की ही टोळी पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी त्यांच्या नेटवर्कचा वापर करत असल्याचे दिसत आहे. .
पंजाबमध्ये कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या केल्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये लुधियानामध्ये कबड्डी खेळाडू तेजपालची देखील हत्या करण्यात आली होती. आता, गुरविंदर सिंगच्या हत्येमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून कबड्डीसारख्या खेळात गुन्हेगारीची घुसखोरी कधी थांबणार आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Romantic Hardik Pandya : हार्दिक पांड्या धूवत होता गाडी, प्रेयसीने जवळ येऊन केलं किस! Video व्हायरल






