लिएंडर पेसचे वडील डॉ. व्हीसी यांचे निधन(फोटो-सोशल मीडिया)
Leander Paes’ father Dr. VC passes away : भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेसच्या वडील आणि माजी ऑलिंपिक कांस्यपदक विजेते डॉ. व्ही.सी. पेस यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी आखरेचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने क्रीडा विश्वावर शोककळा कोसळली आहे. ते काही काळ आजारी असल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी त्यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. व्ही.सी. पेस स्वतः एक यशस्वी क्रीडापटू राहिले आहेत। आ ते भारतासाठी हॉकी खेळले आणि १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये भारताने कांस्यपदकावर नाव कोरले होते. या कामगिरीमुळे त्यांना देशातील अव्वल खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले होते. त्यांचा खेळ, शिस्त आणि मैदानावरील धोरणात्मक विचार यांच्यासाठी त्यांची नेहमीच आठवण काढली जाईल.
हेही वाचा : India vs England मालिकेमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आकाशदीपचे मूळ गावात जंगी स्वागत!
क्रीडा कारकिर्दीनंतर डॉ. पेस यांनी क्रीडा वैद्यक क्षेत्रात मोठे काम केले. त्यांनी भारतीय डेव्हिस कप टेनिस संघ, क्रिकेट संघ आणि इतर अनेक क्रीडा संघटनांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अनेक वर्षे कोलकाता क्रिकेट आणि फुटबॉल क्लबचे अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यांनी इंडियन रग्बी फुटबॉल युनियनचे नेतृत्वही देखील केले आहेत.
लियांडर पेस नेहमीच त्यांच्या वडिलांना त्यांचे सर्वात मोठे प्रेरणास्थान मानत आला आहे. त्याने अनेक प्रसंगी सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांना खिलाडूवृत्ती, कठोर परिश्रम आणि संतुलित पद्धतीने विजय आणि पराभव स्वीकारण्याचे महत्त्व शिकवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार डॉ. पेस बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रासात होते. अलिकडेच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये काही एक सुधारणा होऊ शकली नाही आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर, क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांकडून सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. हॉकी इंडिया, टेनिस असोसिएशन आणि इतर क्रीडा संघटनांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. व्ही.सी. पेस यांचे निधन हे भारतीय क्रीडा जगतासाठी एक मोठे नुकसान आहे यावर सर्वांनी एकमत दर्शवले आहे.
हेही वाचा : कोण आहे Saaniya Chandok? या कंपनीची मालक Arjun Tendulkar ची पार्टनर… जाणून इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स