ऋषभ पंत(फोटो-सोशल मिडिया)
LSG VS MI : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये या हंगामातील ४३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २१५ धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात २१५ धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ फक्त १६१ धावाच करू शकला. त्यानुसार, मुंबई इंडियन्सने ५४ धावांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. या सामन्यात लखनौ संघाची कामगिरी खूपच वाईट राहिली आहे. त्यातच संघाचा कर्णधार ऋषभ पंत याचा फ्लॉप शो सुरूच आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात देखील त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो २ चेंडूमध्ये ४ धावा करून बाद झाला. सामन्यानंतर ऋषभ पंतने आपल्या खराब फलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता. आम्हाला आमच्या फलंदाजीला पाठिंबा द्यायचा आहे. आम्हाला गोलंदाजांना चांगलं वाटवारण द्यायचे आहे. पण आज आमचा दिवस नव्हता. दुसरा संघ देखील चांगले क्रिकेट खेळत आहे आणि तुम्ही स्वतःला प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना श्रेय द्यायला हवे. पण पुढील सामन्यापूर्वी बराच वेळ असल्याने आपण यावर नक्की उपाय शोधू शकतो.”
मुंबई इंडियन्सविरुद्ध कर्णधार पंतची बॅट पुन्हा एकदा फ्लॉप ठरली आहे. त्याला या संन्यात ही मोठी खेळी करण्यात अपयश आले. या सामन्यात त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला असला तरी, त्यानंतर तो दुसऱ्या चेंडूवर विल जॅक्सने त्याला मंगहरी पाठवले. त्याच्या फलंदाजीबद्दल बोलताना ऋषभ पंतने सांगितले की, “मी याबद्दल जास्त विचार करत नाही. अशा हंगामात तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करता आणि मला ते काही करायचे नाही.” यानंतर, पंतने युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवबद्दल सांगितले की, “मयंक यादव परत येत आहे हे पाहून आनंद होत आहे. तो त्याच्याफॉर्ममध्ये परत येत आहे. आशा आहे की चांगलं होत राहील.’
हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ…
आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलएसजीचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला दिसून आला. कारण, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ संघ १६१ धावाच करू शकला. मुंबईचा वानखेडेवरील हा लागोपाठ पाचवा विजय ठरला.