टीम मुंबई इंडियन्स(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभवाची धूळ चारली. लखनौने नानफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलएसजीचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला दिसून आला. कारण, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ संघ १६१ धावाच करू शकला. वानखेडेवरील या विजयासह, मुंबई इंडियन्स संघाने एक विशेष कामगिरी करून दाखवली आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये १५० वा विजय नोंदवत इतिहास रचला आहे. असा करणारा मुंबई इंडियन्स आयपीएलमधील पहिला संघ ठरला आहे.
पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने या बाबतीत सर्व संघांना मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे. मुंबईने आतापर्यंत २७१ आयपीएल सामने खेळले असून त्यात सुपर ओव्हरमध्ये दोन विजयांसह सलग १४८ विजय मिळवले आहेत. लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवून, मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये त्यांचा १५० वा विजय नोंद केला आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंत खेळलेल्या २४८ आयपीएल सामन्यांमध्ये १४० विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स २६१ सामन्यांमध्ये १३४ विजयांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
आयपीएल २०२५ मध्ये मुंबई संघाची खूप खराब सुरुवात झाली होती. संघ ट्रोल देखील होऊ लगाला होता. मात्र, नंतर मुंबई इंडियन्स संघाने पुनरागमन करत लागोपाठ पाच सामने जिकणून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यासह, मुंबई संघ पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे. मुंबई संघाने लागोपाठ पाच सामन्यात विजय मिळवला आहे.
सामन्याची स्थिती
लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्यांना चांगलाच महागात पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ गडी गमावून २१५ धावांचा डोंगर उभारला. ज्यामध्ये रायन रिकेल्टनने ५८, विल जॅक्सने २९, सूर्यकुमार यादवने ५४, नमन धीरने २५ यांनी जोरदार फटकेबाजी करत विजयात महत्वाची भूमिका बजावली. लखनऊ सुपर जायंट्सकडून मयंक यादवने आणि आवेश खानने यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर , प्रिन्स यादवने, रवी बिश्नोईने आणि प्रिन्स यादवने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : GT vs RR : आज कुणाची बॅट तळपणार? कोण काढेल पंजा? Rajasthan Royals समोर गुजरात टायटन्सचे आव्हान..
प्रतिउत्तरात लखनौ सुपर जायंट्सन् हा संघ १६१ धावाच करू शकला. डून मिचेल मार्शने ३४, निकोलस पूरनने २७, आयुष बदोनीने ३५, डेव्हिड मिलरने २४ आणि रवी बिश्नोईने १३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने ४, ट्रेंट बोल्टने ३, विल जॅक्सने २ बळी मिळवले. मुंबईचा हा सलग ५वा विजय ठरला आहे.