फोटो सौजन्य - X
काल लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये सामना पार पडला. यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनऊच्या संघाला पराभूत करून प्लेऑफच्या आशा नष्ट केल्या आहेत. या सीझनमध्ये लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत हा फार काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि त्याचा परिणाम हा त्याच्या संघावर नक्कीच दिसून आला. मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतला आयपीएल इतिहासात सर्वात महागडा किमतीत लखनऊने विकत घेतले होते पण तो त्याची विशेष छाप या सिझनमध्ये पाडण्यात अपयशी ठरला.
आता सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी फ्रँचायझी मालक संजीव गोएंका अनेकदा स्टेडियममध्ये उपस्थित असतात. संघाच्या पराभवानंतर अनेक वेळा तो खेळाडूंवर रागावलेला दिसतो पण तो संघाला प्रोत्साहन देण्यास मागेपुढे पाहत नाही.
प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर, संजीव गोएंका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “हंगामाचा दुसरा भाग आव्हानात्मक होता, परंतु त्यातून धैर्य मिळवण्यासाठी बरेच काही आहे. भावना, प्रयत्न आणि उत्कृष्टतेचे क्षण आपल्याला खूप काही देतात. दोन सामने शिल्लक आहेत. चला अभिमानाने खेळूया आणि दृढनिश्चयाने समाप्त करूया.” यासोबतच संजीव गोयंका यांनी एक फोटोही शेअर केला आहे ज्यामध्ये संजीव गोयंका संघातील खेळाडूंसोबत हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत. याशिवाय, गोयंका यांनी संघाचा कर्णधार ऋषभ पंतच्या खांद्यावर हात ठेवला आहे.
Captain Rishabh Pant, LSG players & Sanjeev Goenka after the match yesterday. ❤️ pic.twitter.com/n58Xl8efBC
— Tanuj (@ImTanujSingh) May 20, 2025
लखनौ सुपर जायंट्स आता आयपीएल २०२५ मधून बाहेर पडले आहेत. काल रात्री, ऋषभ पंतच्या एलएसएलला सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला, या पराभवासह एलएसएल देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. आतापर्यंत, LSG संघाने आयपीएल २०२५ मध्ये १२ पैकी फक्त ५ सामने जिंकले आहेत, तर संघाला ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मेगा लिलावात पंतला २७ कोटी रुपयांना विकत घेणाऱ्या संजीव गोयंका यांच्या निर्णयावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण पंतची या हंगामात कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना फक्त १३५ धावा केल्या आहेत.