ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) आता लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सी मध्ये दिसणार आहे. मँचेस्टर युनायटेडने त्यांच्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मँचेस्टर युनायटेडने अँटोनीबाबत फुटबॉल क्लब अजाक्सशी (Ajax Football Club) करार केला असून मिळालेल्या माहितीनुसार, अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड आणि अजाक्स यांच्यात ८१.३ मिलियन पौंड म्हणजेच ७५० कोटीचा करार झाल्याचे समजत आहे. तसेच इंग्लिश प्रीमिअर लीगच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा चौथा सर्वात मोठा करार ठरला आहे.
अँटोनी हा २२ वर्षांचा आहे. २०२० पर्यंत त्यानं बाझीलच्या साओ पाउलो क्बलचं प्रतिनिधित्व केल होत. त्यानंतर अजॅक्सनं त्याला आपल्या संघाचा सामील करून घेतल्यावर त्याने गेल्या दोन वर्षांत अजॅक्सकडून ८२ सामने खेळले. यादरम्यान त्यानं २४ गोल केले आहेत.
अँटोनीची राष्ट्रीय संघासाठी कामगिरी :
अँटोनीनं गेल्या वर्षीच ब्राझीलकडून पदार्पण केलं होतं. ऑक्टोबर २०२१ मध्ये तो ब्राझीलकडून प्रथमच मैदानात उतरला. आतापर्यंत तो त्याच्या राष्ट्रीय संघासाठी ९ सामने खेळलाय. यामध्ये त्याच्या नावावर दोन गोलची नोंद आहे.