फिन अॅलन(फोटो-सोशल मीडिया)
MCL 2025 : मेजर लीग क्रिकेट २०२५ चा पहिला सामना आज १३ जून रोजी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात ओकलंड कोलिझियम येथे खेळवण्यात आला होता. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने वॉशिंग्टन फ्रीडमला १२३ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर फिन अॅलनचे वादळ घोंघावले होते. त्याने या सामन्यात स्फोटक फलंदाजी करून इतिहास रचला आहे. त्याने ५१ चेंडूचा सामना करत १५१ धावांची वादळी खेळी खेळली.
फिन अॅलनने टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. फिन अॅलने टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर क्रिस गेल आणि एस्टोनियाचा साहिल चौहान यांच्या नावावर हा विक्रम संयुक्तपणे नोंदवण्यात आला होता. या दोन्ही फलंदाजांनी टी-२० सामन्यात अनुक्रमे १८-१८ षटकार ठोकले आहेत. परंतु आज झालेल्या सामन्यात अॅलनने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध १९ षटकार मारून विक्रम आपल्या नावे केला आहे.
हेही वाचा : WTC Final: भविष्यातील सर्वात मोठा अष्टपैलू खेळाडू माहिती आहे का? रिकी पॉन्टिंगने लावला ‘या’ खेळाडूवर डाव..
फिन अॅलन टी-२० मध्ये सर्वात जलद १५० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना त्याने आज फक्त ४९ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठलाया आहे. या खेळीत त्याने ५१ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने २९६.०८ च्या स्ट्राईक रेटने १५१ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने १९ षटकार आणि ५ चौकार लगावले आहेत. त्याच्या खेळीच्या जोरावर फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने विजय मिळवला.
FINN ALLEN SMASHED 151* (51) WITH 19 SIXES IN THE MLC. 🥶 – The most sixes in a T20 innings. pic.twitter.com/7EOnaxkaw9 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025
सामन्याची स्थिती :
वॉशिंग्टन फ्रीडमने ओकलंड कोलिझियम येथे टॉस जिंकला आणि सॅन फ्रान्सिस्कोला प्रथम फलंदाजीसाठी आंतरीत केले होते. प्रथम फलंदाजी केल्यानंतर, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या संघाने २० षटकांत पाच गडी गमावून २६९ धावांचा डोंगर उभा केला होता. फिन अॅलनने संघाकडून सर्वाधिक १५१ धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय हसन खानने १८ चेंडूत नाबाद ३८ धावा, संजय कृष्णमूर्तीने २० चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले. २७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमचा संपूर्ण संघ १३.१ षटकात केवळ १४६ धावाच करू शकला.