जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन(फोटो-सोशल मिडिया)
MI vs LSG : आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. लखनौकडून नानफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गड्यांच्या बदल्यात २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ १६१ धावाच करू शकला. या सामन्यात एलएसजीची कामगिरी सुमार राहिली, तर मुंबईने दर्जेदार कामगिरी करत सलग पाचवा सामना जिंकला. मुंबईचा ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहची पत्नी देखील हा सामना बघायला आलेली होती. परंतु, ती सामान्यानंतर संतापलेली दिसून आली. जसप्रीत बुमराहचा लहान मुलगा अंगदच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याची खिल्ली उडवल्याबद्दल ट्रोलर्सवर तिने टीका केली. याबाबत संजना गणेशने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर काल झालेल्या आयपीएलच्या 45 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने होते. हा सामना बघण्यासाठी जसप्रीत बूमराहची पत्नी तिच्या मुलाला घेऊन सामना बघायला आली होती. सामन्या दरम्यान बूमराह-गणेशन यांचा लहान मुलगा अंगदच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याला ट्रोल करण्यात आले. या प्रकारावर संजना गणेशन् चांगलीच भडकली. ती म्हणाली ‘आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही.’ अशा कडक शब्दात तिने ट्रोलर्सला सुनावले आहे.
संजना गणेशन म्हणाली की, ‘आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आमच्या शक्तीने सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण इंटरनेट हे एक घृणास्पद, घृणास्पद ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात, परंतु कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो आणि दुसरे काहीही नाही.’
तसेच तीने पुढे लिहिले आहे की, ‘आमचा मुलाला व्हायरल इंटरनेट कंटेंट किंवा राष्ट्रीय बातम्यांमध्ये सहभागी होण्यात आम्हाला रस नाही, जिथे अनावश्यकपणे मतप्रवृत्तीचे कीबोर्ड योद्धे ३ सेकंदांच्या फुटेजवरून अंगद कोण आहे? त्याची समस्या काय आहे? त्याचे व्यक्तिमत्व काय आहे? हे ठरवत आहेत. आता तो दीड वर्षांचा आहे. बाळाच्या संदर्भात आघात आणि नैराश्यासारखे शब्द फेकणे हे आपण एक समुदाय म्हणून कोण बनत आहोत याबद्दल बरेच काही सांगते आणि ते खरोखरच खूप दुःखद आहे.
शेवटी गणेशन म्हणते की, ‘तुम्हाला आमच्या मुलाबद्दल काहीही माहिती नाही, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे मत ऑनलाइन खरे ठेवा. आजच्या जगात थोडीशी प्रामाणिकता आणि थोडीशी दयाळूपणा खूप पुढे जात असतो.’ असे तिने इस्टाग्रामवरील पोस्टवर लिहिले आहे.
हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ…
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा २०२१ मध्ये विवाह झाला. त्यांनी मार्चमध्ये त्यांचा चौथा लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच सप्टेंबर २०२३ मध्ये अंगद या मुलाचा जन्म झाला.