फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मोहम्मद शामी फलंदाजी : ॲडलेड कसोटी सामन्यात भारताच्या पराभवानंतर एका खेळाडूची खूप चर्चा होत आहे. हा खेळाडू वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आहे. जसप्रीत बुमराह चमकदार गोलंदाजी करत आहे, परंतु त्याला दुस-या टोकाकडून आवश्यक असलेला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत नाही आणि म्हणूनच शामीची उणीव भासत आहे जो सध्या आपला फिटनेस सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान, शामीने असे काही केले की ज्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले असेल आणि ते त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार करत असतील.
Rishabh Pant : का सोडलं रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सला? स्वतः कोचने केलं स्पष्ट
शामी सध्या भारताच्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळत आहे. सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत या संघाचा सामना चंदीगडशी होत होता. ज्यामध्ये शमी आपल्या बॅटने चर्चेत आला आहे. या सामन्यात शामीने तुफानी फलंदाजी केली आहे. बंगालचा संघ सातत्याने विकेट गमावत होता. संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठणे कठीण होते. संघ दीडशेचा टप्पा ओलांडू शकेल की नाही, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, शमीने इतकी चांगली फलंदाजी केली की संघाने २० षटकांत नऊ गडी गमावून १५९ धावा केल्या. शमीने १७ चेंडूंचा सामना करत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १८८.२३ होता.
या सामन्यात शामीनेही आपल्या कोट्यातील चार षटके टाकली आणि अवघ्या २५ धावांत एक विकेट घेतली. ही विकेट सलामीवीर अर्शलान खानची होती, जी त्याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घेतली. चंदीगडला संपूर्ण षटके खेळूनही लक्ष्य गाठता आले नाही आणि नऊ विकेट गमावून केवळ १५६ धावा करता आल्या. बंगालने तीन धावांनी विजय मिळवला ज्यात शामीने महत्त्वाची भूमिका बजावली.
MOHAMMED SHAMI MADNESS WITH BAT IN SYED MUSHTAQ ALI KNOCK-OUTS. 🤯👌 pic.twitter.com/rAG0bAPPSF
— Johns. (@CricCrazyJohns) December 9, 2024
याआधी राजस्थानविरुद्ध राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी करत २६ धावांत तीन बळी घेतले होते. शामीने बिहारविरुद्ध एक विकेट घेतली. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर शमीने आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. त्या विश्वचषकात त्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो अद्याप बाहेर आहे. एनसीएने त्याला ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी अद्याप मंजुरी दिलेली नाही. पण ऑस्ट्रेलियातील प्रत्येकजण शामीला मिस करत आहे.
मोहम्मद शामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे असे वृत्त समोर येत आहेत. परंतु यासंदर्भात बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मागील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे तो बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर होता.