फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दिल्ली कॅपिटल्सचे कोच : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा लिलाव मागील महिन्यामध्ये झाला. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस करण्यात आला. यामध्ये भारताचा खेळाडू रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्स रिषभ पंतला २७ कोटींना विकत घेतले आहे. लिलाव होण्याच्या एक महिन्याआधी रिषभ पंतने त्याच्या X अकाउंटवर ट्विट केले होते की “जर मी लिलावामध्ये आलो तर माझ्यावर किती बोली लागेल”.
आता जुन्या टीम दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबद्दल मोठा खुलासा केला आहे. हेमांग बदानी म्हणाले की, दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण पंतने त्याचे बाजारमूल्य तपासण्याचे ठरवले होते. यामुळेच दिल्लीने प्रयत्न करूनही पंतला कायम करण्यात आले नाही. ऋषभ पंत आयपीएल लिलावात उतरला होता, जिथे त्याला इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. लखनौ सुपरजायंट्सने पंतवर २७ कोटींची बोली लावली, जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च आहे.
WTC Final : भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कसा पोहोचणार? वाचा संपूर्ण समीकरण
दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक हेमांग बदानी यांचे विधान ऋषभ पंतच्या दाव्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ऋषभ पंतने सोशल मीडिया X वर पोस्ट केले होते की त्याला कायम न ठेवण्यामागे कोणतेही आर्थिक कारण नाही. पण हे देखील खरे आहे की या पोस्टच्या दीड महिन्यापूर्वी पंत यांनी एक पोस्ट देखील केली होती ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की मला आपल्यासाठी किती मोठी बोली लागेल हे पाहायचे आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे नवे प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी सुब्रमण्यम बद्रीनाथ यांच्यासोबत यूट्यूब शोमध्ये अनेक खुलासे केले. ऋषभ पंतशी संबंधित प्रश्नावर बदानी म्हणाले, ‘जर तुम्हाला एखाद्या खेळाडूला कायम ठेवायचे असेल, तर दोन्ही पक्षांना ते मान्य करावे लागेल. आम्ही त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. व्यवस्थापनाने त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक फोन कॉल्स आणि मेसेज आले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
भारतासाठी ४ कसोटी आणि ४० एकदिवसीय सामने खेळलेला हेमांग बदानी पुढे म्हणाले की, ‘मी याबद्दल थोडा वेगळा विचार करतो. त्याला कायम ठेवायचे नव्हते. तो (पंत) म्हणाला की त्याला लिलावात जायचे आहे जेणेकरून बाजारातील मूल्य कळू शकेल. त्याला असे वाटले की आपण ठेवलेल्या कमाल रकमेपेक्षा जास्त रक्कम १८ कोटींपेक्षा मिळवू शकतो. त्याचा अंदाजही बरोबर होता त्याला २७ कोटी रुपये मिळाले. त्यांच्यासाठी चांगले. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आम्ही त्याला मिस करू. पण आयुष्य पुढे जातं.
If go to the auction. will I be sold or not and for how much ??
— Rishabh Pant (@RishabhPant17) October 11, 2024