रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Khalil Ahmed reacts to Rohit Sharma :रोहित शर्माने आधी टी२० आणि नंतर कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता केवळ एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे, त्याने कधीच स्पष्ट केले आहे, परंतु त्याच्या २०२७ च्या टी२० विश्वचषकात खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्मा आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून निवृत्त घेण्याची शक्यता आहे. रोहितने अलीकडेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी देखील पास केली आहे. रोहित शर्माबद्दलच्या खेळण्याबाबत अनेकजण आपले मतं व्यक्त करत आहेत. अशातच आता सीएसकेचा गोलंदाज खालील अहमदने रोहित शर्माने पुढील १० वर्षे खेळत राहावे, त्याने निवृत्ती घेऊ नये असे म्हटले आहे.
हेही वाचा : शुभ’मना’ला तडे? सारा तेंडुलकरसोबत ‘तो’ मुलगा कोण? जाणून घ्या सविस्तर..
एका मुलाखती दरम्यान बोलताना खलील अहमदने म्हटले आहे की रोहित शर्माने पुढील १० वर्षे निवृत्तीचा विचार करू नये, कारण त्याच्यासारखे खेळाडू खूप कमी असतात. खलील अहमद रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल देखील बोलला आहे. तो म्हणला की, “तो खेळाडूंशी खराब कामगिरीवर बोलत असतो आणि यामुळे तो खास वीतकी ठरतो.”
खलील पुढे म्हणाला की, “जेव्हा आम्ही २०१९ मध्ये राजकोटमध्ये खेळत होतो, तेव्हा बांगलादेशविरुद्ध मालिका सुरू होती. तो सामन्यानंतर माझ्या खोलीत आला होता, माझा सामना चांगला झाला नव्हता. मला त्यावेळी फक्त एकच विकेट मिळाली होती, जवळजवळ ३० किंवा ३५ धावा झाल्या. आम्ही स्टेडियम सोडत होतो, संपूर्ण ड्रेसिंग रूम रिकामा असताना तो माझ्याशी एकटाच बोलत होता. मी निघताना रोहित भाईचे चाहते खूप ओरडत होते. तेव्हा त्याने मला म्हटले की खलील हे सर्व तुझ्यासाठी घडायला हवे, तुला असेच विचार करावे लागणार आहेत.”
हेही वाचा : PAK vs IND : ‘नॉन-स्ट्राइक एंडवर उभा तुमचा बाप..’, वीरेंद्र सेहवागची पाकिस्तानविरुद्ध अविस्मरणीय फलंदाजी
खलील अहमद पुढे म्हणाला की, “सामना संपल्यानंतर, इतक्या बैठका, गोष्टी होत असतात की खलील कोण आहे, याचा अर्थ ते ठीक आहे, ते घडते. पण माझ्या खोलीत येऊन, मला समजावून सांगत मला ती स्वप्ने दाखवून की खलील तुला असा विचार करावा लागणार आहे. हे कुंपण तुझ्यासाठी असावे आणि तुला स्वतःला तुझ्या आतमध्ये असणारी क्षमता माहित नाही. त्याचा नेहमीच असा दृष्टिकोन असायचा की, तुला तुझ्या आत असलेली क्षमता माहित नाही. तो नेहमीच मला मार्गदर्शन करत असे. जेव्हा तो इतरांना मार्गदर्शन करत असे तो जे माझ्यासोबत ज्या पद्धतीने हे करत असे तेच मी त्याला ऋषभसोबत देखील करताना पाहिले आहे. तो कर्णधार कसा आहे आहे असे वाटले होते.”