Mumbai Mayor Cup Chess : मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात; १५६ शालेय बुद्धिबळपटूंमध्ये रंगणार चुरस!
स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, नगरसेवक महादेव शिवगण, नगरसेवक रोहिदास लोखंडे आणि क्रीडापटू गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना, सीबीईयूएम आणि आरएमएमएस यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परळ येथील आरएमएमएसच्या वातानुकूलित सभागृहात स्पर्धेचे सामने खेळवले जातील. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 वर्षांखालील अशा 9 वयोगटांत ही स्पर्धा होणार आहे.
Asian Para Games : नितेश-थुलसिमथीची रौप्यपदकाला गवसणी; पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताची दमदार कामगिरी!
स्पर्धेत फिडे मानांकित कनिष्ठ बुद्धिबळपटूंसह अनेक होतकरू खेळाडू सहभागी होणार आहेत. साम्यक कुळकर्णी, रिशी अग्रवाल, आर्यन उपरकर, अथर्व मुळीक, अद्वैत लोंढे, कार्तिकेय सावंत, स्मित लोके, सार्थ लोके, अर्थम तोते, रिहान कुळकर्णी, आयांश पाटील आणि कृष्णाम गोयल यांसारखे खेळाडू विजेतेपदासाठी प्रतिस्पर्ध्यांना शह-प्रतिशह देण्यासाठी सज्ज आहेत.
स्पर्धेतील प्रत्येक वयोगटात 15 आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील खेळाडूंना आपल्या कामगिरीच्या जोरावर पारितोषिक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इच्छुक महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क पूर्वतयारी मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चेंबूरनाका येथील महापालिका शाळेत आयोजित मार्गदर्शन उपक्रमाला नगरसेवक महादेव शिवगण, बुद्धिबळ प्रशिक्षक डॉ. सिद्धेश नर, डॉ. इकबाल शेख, डॉ. जितेंद्र लिंबकर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेपूर्वी बुद्धिबळातील डावपेच समजून घेण्याची आणि स्पर्धात्मक खेळासाठी तयारी करण्याची संधी मिळाली.
Ans: स्पर्धेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
Ans: या स्पर्धेत 156 शालेय बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत.
Ans: आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. एलआयसी या स्पर्धेचा सहपुरस्कर्ता आहे.






