टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारा निरज चोप्राने भारताचा झेंडा अटकेपार रोवला आहे. सुवर्ण पदाची विक्रमी कमाई केल्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात निरजने अधिराज्य गाजवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नीरज चोप्राचं नाव घोषित करण्यात आलं आहे. एका अमेरिकन मासिकात दिलेल्या माहितीनुसार 2024मध्ये पुरुष अॅथलिट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नीरजचं नाव घोषित केलं आहे. मागच्या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या अरशद नदीम नंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या २७ वर्षीय नीरज चोप्राने कॅलिफोर्नियामधील एका मासिकाच्या २०२४ सालाच्या रँकिंगमध्ये पहिला स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतनंतर त्याने ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स ज्याने तब्बल दोन वेळा जागतिक चॅम्पियनयन शिप जिंकली त्याचा विक्रम मोडला आहे.
नदीम या स्पर्धेच्या पाचव्या स्थानावर आहेत कारण त्याने ऑलिंपिकसह फक्त एकच इतर स्पर्धा, पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये तो चौथ्या स्थानावर होता. पॅरिस ऑलिंपिकमध्ये नदीमने 92.97 मीटर भाला फेकून पाकिस्तानला सुवर्ण पदक जिंकून दिलं. तर नीरज चोप्राने 89.45 मीटर फेकून रजत पदक प्राप्त केले होते. ‘ट्रैक एंड फील्ड न्यूज’ या मासिकामध्ये जागतिक पातळीवरच्या खेळाडूंबाबातची माहिती सांगण्यात येते. जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नीरज चोप्राचं नाव घोषित करण्यात आलं आहे. 1948 पासून हे मासिक प्राकाशित होत आहे. या मासिकात प्रत्येक वर्षी खेळांतील जागतिक आणि अमेरिकन रँकिंग प्रकाशित करते. नीरजचं नाव सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून घोषित झाल्यामुळे भारतासाठी ही अत्यंत गौैरवाची बाब आहे.