न्यूझीलंडचा भारताला व्हाईट वॉश (फोटो- ट्विटर)
मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत अतिशय रोमांचक सामना रंगला. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातील स्पर्धा श्वास रोखणारी ठरली. न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला आणि भारतासमोर विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य होते. न्यूझीलंडने भारतीय संघाचा दुसरा डाव स्वस्तात आटोपून इतिहास रचला. भारताला पहिल्यांदा घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. भारताला 121 धावांत ऑलआउट करून किवी संघाने मुंबई कसोटी 25 धावांनी जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली. एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर एक विक्रम रचला आहे. वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याने केला आहे.
न्यूझीलंडचा पेपर भारताला फारच कठीण गेला आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या एजाज पटेलने नवीन विक्रम केला आहे. या सामन्यात सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे एजाज पटेलची. या सामन्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याने या मैदानावर एक मोठा विक्रम केला आहे. एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. असा विक्रम करणारा तो पहिला विदेश गोलंदाज ठरला आहे.
एजाज पटेलपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथमच्या नावावर होता. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या कसोटी सामन्यात एकूण २२ धावा घेतल्या होत्या. आता या खेळपट्टीवर एजाज पटेलने २५ विकेट्स घेत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एजाज पटेलने ४ डावांमध्ये २५ विकतेस घेतल्या आहेत. भारतीय खेळपट्टीवर सर्वाधिक विकेट घेणारा पहिला विदेश गोलंदाज ठरला आहे.
Five wickets fall in the first seven overs of the India chase! Ajaz Patel (3-16), Matt Henry (1-10) and Glenn Phillips (1-1) making plays in Mumbai! Follow play LIVE in NZ on @skysportnz 📺 or @SENZ_Radio 📻 LIVE scoring https://t.co/VaL9TehXLT 📲 #INDvNZ #CricketNation 📸 BCCI pic.twitter.com/bnOrXQvHto
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 3, 2024
न्यूझीलंडचा विजय
न्यूझीलंड संघाने भारतात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. या विजयात फिरकीपटू एजाज पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. 35 वर्षांपूर्वी भारतात कसोटी सामना जिंकणाऱ्या संघाने येऊन क्लीन स्वीप केला होता. मुंबईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात एजाज पटेलने पहिल्या डावात 5 विकेट्स घेत दुसऱ्या डावात केवळ 57 धावांत 6 बळी घेत कहर केला होता.
गोलंदाजांनी सामना फिरवला
पहिल्या डावात 235 धावा केल्यानंतर न्यूझीलंड संघाने भारताला 263 धावांवर ऑलआउट करत मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. टीम इंडियाकडे 28 धावांची आघाडी होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी करत सामना भारताकडे वळवला. 171 धावांत 9 गडी बाद करत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलून भारतासाठी संधी निर्माण केली. तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाने स्कोअरमध्ये आणखी 3 धावांची भर घालून 174 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने या सामन्यात एकूण 10 विकेट घेतल्या.
हेही वाचा: IND VS NZ : हुश्श…भारतात येऊन न्यूझीलंडने बदलला इतिहास! मालिकेत टीम इंडियाला 3-0 केलं पराभूत
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा डाव 174 धावांवर कमी केला आणि फलंदाजांसाठी 147 धावांचे लक्ष्य ठेवले, तर किवी गोलंदाजांनी ते अवघड केले. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल आणि सरफराज खान यांना झटपट बाद करत किवी संघाने भारताची धावसंख्या 5 विकेट्सवर 29 धावांवर आणली. ऋषभ पंतने येऊन आक्रमक फलंदाजी करत सामना भारताकडे वळवला पण तोही 64 धावांवर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. न्यूझीलंडकडून एजाज पटेलने सामन्यात 11 विकेट घेतल्या.