फोटो सौजन्य - iplt20 सोशल मीडिया
काल मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने सीझनचा पहिला विजय नावावर केला आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली विशेषतः युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी पदार्पण करणारा अश्वनी कुमार याने संघासाठी तीन ओव्हरमध्ये २४ धावा देत चार विकेट नावावर केले. तर दीपक चाहरने संघासाठी दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतले. मुंबईने संघासाठी हार्दिक पांड्याने संघासाठी एक क्रिकेट मिळवली. मुंबई इंडियन्स २३ वर्षीय गोलंदाज अश्विनी कुमारने केकेआर विरुद्ध सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली आणि आता सध्या सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
कालच्या सामन्याआधी कोणालाही अश्वनी कुमार हे नाव माहिती नव्हते पण त्याने त्याच्या कामगिरीने त्याचे नाव काही तासांमध्ये कमावले आहे. आता पंजाबच्या झांजेरी येथून येणारी अश्विनी रातोरात स्टार बनली आहे. पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी या तरुण गोलंदाजाला खूप संघर्ष करावा लागला आहे. अश्विनीने क्रिकेटच्या उंचीवर पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे त्याचे वडील आणि भाऊ यांनी सांगितले. मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला ३० लाख रुपयांच्या किमतीत खेळाडूला खरेदी केले आणि त्याच्या पदार्पण सामन्यात त्याला स्टार बनवले.
Ashwani Kumar said, “Hardik Pandya told me you’re from Punjab, and Punjabi are not scared, they scare others. It gave me confidence”. pic.twitter.com/lESN7RyQ2v
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 1, 2025
आता पंजाबच्या झांजेरी येथून येणारी अश्वनी रातोरात स्टार बनला आहे. पण या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी या तरुण गोलंदाजाला खूप संघर्ष करावा लागला आहे. अश्वनीने क्रिकेटच्या उंचीवर पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे त्याचे वडील आणि भाऊ यांनी सांगितले.
मुंबई इंडियन्सच्या आयपीएल 2025 चा कामगिरीबद्दल बोलायचं झाले तर संघाचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झाला होता. या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता तर दुसरा सामना संघाचा गुजरात जायंट्स विरुद्ध झाला या सामन्यात देखील संघाला हार मानावी लागली. मुंबई इंडियन्स संघ कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवून सीझनचा पहिला विजय नावावर केला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ च्या पॉईंट टेबलवर संघाच्या दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे