Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2026: Novak Djokovic विम्बल्डनचा ‘बादशाह’, 39 वर्षीही सर्वात दीर्घ Quarter Final केली नावावर

विम्बल्डनच्या सर्वात लांब उपांत्यपूर्व सामन्यात नोव्हाक जोकोविच आणि फेलिक्स ऑगर-अलियासिम एकमेकांसमोर उभे ठाकले. ५ तास १५ मिनिटे चाललेला हा पाच सेटचा सामना जोकोविचने जिंकला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 08, 2026 | 10:52 AM
नोव्हाक जोकोविचची उपांत्य फेरीत धडक (फोटो सौजन्य - X.com)

नोव्हाक जोकोविचची उपांत्य फेरीत धडक (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • विम्बल्डन २०२६ चा सर्वात दीर्घ सामना 
  • नोव्हाक जोकोविचने जिंकली उपांत्यपूर्व फेरी 
  • फेलिक्स ऑगरला हरवले 
टेनिसचा दिग्गज आणि २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचने पुन्हा एकदा आपला झुंजारपणा दाखवत विम्बल्डन २०२६ च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कॅनडाच्या तिसऱ्या मानांकित फेलिक्स ऑगर-अलियासिमशी झाला. जोकोविचने हा रोमांचक पाच-सेटचा सामना ७-६, ३-६, ६-३, ६-७, ७-६ असा जिंकला. हा सामना ५ तासापेक्षा अधिक रंगला होता आणि झुंज देत नोव्हाकने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. 

Wimbledon 2025 : Novak Djokovic चा जलवा कायम! डे मिनौरचा पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी

विम्बल्डनचा सर्वात दीर्घ उपांत्यपूर्व सामना

My longest Wimbledon match ever. An unforgettable nightshift 💪 pic.twitter.com/q0D10PVwFw — Novak Djokovic (@DjokerNole) July 7, 2026

नोव्हाक जोकोविच आणि फेलिक्स ऑगर-अलियासिम यांच्यातील सामना ५ तास आणि १५ मिनिटे चालला. हा विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात दीर्घ उपांत्यपूर्व सामना आहे. तसेच, हा जोकोविचच्या विम्बल्डन कारकिर्दीतील सर्वात दीर्घ सामना होता आणि आपल्या पोस्टमध्येही त्याने तसंच लिहिलं आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविचला अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या सेटदरम्यान त्याला पोटरीला दुखापत झाली, परंतु असे असूनही, त्याने हार मानली नाही आणि एक उल्लेखनीय पुनरागमन केले.

उपांत्य फेरीत सामना सिनरशी

विद्यमान विम्बल्डन विजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिनरने जॅन-लेनार्ड स्ट्रफवर ७-५, ७-६, ६-३ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत सिनरचा सामना सात वेळचा चॅम्पियन नोव्हाक जोकोविचशी होईल. इटलीचा सिनर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत ११ सामने झाले असून, त्यात सिनरने ६-५ अशी आघाडी घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचने सिनरला पराभूत केले होते. तथापि, गेल्या वर्षीच्या विम्बल्डन उपांत्य फेरीसह तो मागील पाच सामने हरला होता.

लंडन येथील ऑल-इंग्लंड लॉन टेनिस क्लबमध्ये पहिला सेट गमावल्यानंतर आणि दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच ब्रेकने मागे पडल्यानंतर, स्ट्रफने आपली आक्रमकता वाढवली. त्याने आपल्या शक्तिशाली फोरहँडचा आणि नेटजवळच्या योग्य हालचालींचा वापर करून सिनरला अडचणीत आणले.

Wimbledon 2026: मोठा उलटफेर! ओसाकाचा सुपर शो; नंबर-1 सबालेंकाचा पराभव, सिनर सलग पाचव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये

नोव्हाक आणि विराटची मैत्री 

क्रिकेट आणि टेनिस हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी आहेत. क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली आणि सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच हे चांगले मित्र आहेत. सध्या विम्बल्डनमध्ये सहभागी असलेल्या जोकोविचने लवकरच भारताला भेट देऊन कोहलीसोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जोकोविच जिओस्टारवर म्हणाला, “मला विराट कोहलीसोबत क्रिकेट आणि टेनिस खेळायला खूप आवडेल. मी लवकरच भारतात येण्याची योजना आखत आहे. आम्ही त्याबद्दल बोलत आहोत. मला माहीत आहे की विराट एक जागतिक स्टार आहे, पण विशेषतः भारतात तो अप्रतिम आहे. त्याने माझे आदरातिथ्य करावे आणि मला फिरवून आणावे, अशी माझी इच्छा आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल आणि भारतीय क्रिकेटबद्दल खूप आदर आहे.”

नोव्हाकने पुढे सांगितले की, “मी सर्बियाचा आहे, जिथे क्रिकेट हा फार मोठा खेळ नाही. पण माझ्या संघातील काही खेळाडू ब्रिटिश आहेत आणि त्यांना क्रिकेट खूप आवडते. त्यामुळे मी गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा खेळ शिकत आहे. मला अजूनही माझ्या क्रिकेट कौशल्यावर काम करायचे आहे. कदाचित विराट मला माझ्या तंत्रात आणि बॅट स्विंगमध्ये मदत करू शकेल. माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आणि कौतुक आहे. मला त्याला त्याच्या देशात, भारतात भेटायला आवडेल.”

Web Title: Novak djokivic wins longest quarter final and defeated felix auger in wimbledon 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • Novak Djokovic
  • Sports News
  • Wimbledon

संबंधित बातम्या

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
1

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?
2

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार
3

आता थांबायचं नाही! Olympic 2036 साठी भारताचा ‘मास्टर प्लॅन’; हॉकीचा चेहरामोहरा बदलणार

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा
4

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.