फोटो सौजन्य - Social Media/ BJP.Org
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : देशामध्ये आज ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आज भारताचे जे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेले खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. याचे निमंत्रण त्यांना आधीच देण्यात आले होते. त्याचबरोबर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण देखील झाले आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना एक स्वप्न व्यक्त केले आहे. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी वर्णन केले. ते म्हणाले की भारत आता मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यास तयार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करून भारताने दाखवून दिले आहे की, आपला देश मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आज ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणारे तरुण आमच्यासोबत आहेत. १४० कोटी भारतीयांच्या दिशेने मी सर्वांचे अभिनंदन करतो. खेळाडू काही दिवसांनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ रवाना होईल, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
हेदेखील वाचा – देशासाठी दुर्भाग्य, सुवर्णपदक हिसकावलं! ऑलिम्पिक मेडलिस्ट विजेंदर सिंहने केला खुलासा
पुढे ते म्हणाले की, G-२० ची ज्याप्राकारे तयारी केली आणि ज्याप्रकारे कार्यक्रम झाला अशा प्रकारचा कार्यक्रम कधी कुठे झाला नाही. त्यामुळे आता सिद्ध झाले आहे की, भारत मोठ्यातला मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता भारताचे स्वप्न आहे की, २०३६ मध्ये भारत ऑलिम्पिक आयोजित करण्याचे स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत.
याच महिन्यात क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही लोकसभेत सांगितले होते की, भारत ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणाला करायचे हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ठरवते. २०२८ ऑलिम्पिकचे यजमानपद अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराकडे सोपवण्यात आले आहे. २०३२ ऑलिम्पिक खेळ ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार आहेत.