शाई होप(फोटो-सोशल मीडिया )
Captain Shai Hopla Bade Vikramachi Sandhi: वेस्ट इंडिजने १२ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात इतिहास नोंदवला आहे. वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध इतिहासातील २०२ धावांन सर्वात मोठा विजय मिळवला आहे. याशिवाय, कॅरेबियन संघाने या सामन्यात अनेक मोठे विक्रम देखील नोंदवले आहे. वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयात कर्णधार शाई होपने महत्त्वाची भूमिका वठवली. या दरम्यान, त्याने १२० धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. कर्णधार शाई होपचे हे एकदिवसीय स्वरूपातील १८ वे शतक ठरले.
कर्णधार शाई होपसाठी लवकरच वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावण्याची नामी संधी मिळणार आहे. एकूणच, तो कॅरेबियन संघासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनण्याची संधी आहे. गेल्या काही वर्षांत वेस्ट इंडिजसाठी एकदिवसीय स्वरूपात संघासाठी शाई होप सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून समोर आला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या इतिहासात अनेक महान फलंदाज झाले आहेत. परंतु, सर्वांना पिछाडीवर टाकून शाई होप त्याच्या नावावर एक मोठा विक्रम करू शकतो.
हेही वाचा : संजू सॅमसनला Asia Cup 2025 साठी भारतीय संघात स्थान नाही! ‘त्या’ एका कारणाने आली ही वेळ…
१२ ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध शाई होपने झळकवलेले शतक हे होपच्या कारकिर्दीतील १८ वे एकदिवसीय शतक ठरले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाई होप सध्या तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्याच्या पुढे महान फलंदाज ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांचा नंबर आहे. लाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९ शतके ठोकली आहेत. तर गेलच्या नावे २५ शतके जमा आहेत. दोन शतके ठोकताच होप लाराला मागे टाकू शकतो. गेलला मागे टाकण्यासाठी त्याला अजून आठ शतके ठोकावी लागणार आहे.
होपचे वय ३१ वर्ष आहे. तो संघाचा कर्णधार असून तो तंदुरुस्त आहे आणि फॉर्ममध्ये देखीलआहे. जर त्याचा फॉर्म असाच राहिला तर तो पुढील ४-५ वर्षे सहज खेळून तो ख्रिस गेलचा सर्वाधिक २५ शतकांचा विक्रम सहज मोडू शकतो. शाई होपने २०१६ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
आतापर्यंत, शाई होपने १३७ डावांमध्ये १८ शतके आणि २९ अर्धशतके झळकावत ५,८७९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १७० राहिली आहे. होपची सरासरी ५०.२४ आहे.